Bus Fare Hike: ऐन दिवाळीत प्रवाशांची लूट, खासगी बस चालकांवर आता थेट कारवाई, हेल्पलाईन नंबर जारी!  

Last Updated:

Bus Fare Hike: दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या मोठी असल्याने खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट होतेय. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

Bus Fare Hike: ऐन दिवाळीत प्रवाशांची लूट, खासगी बस चालकांवर आता थेट कारवाई, हेल्पलाईन नंबर जारी!
Bus Fare Hike: ऐन दिवाळीत प्रवाशांची लूट, खासगी बस चालकांवर आता थेट कारवाई, हेल्पलाईन नंबर जारी!
पुणे : दिवाळी सणाच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे या काळात खासगी बसचालक प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने तिकीटदर आकारतात. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या तिकिटापेक्षा दीडपट तिकीट आकारण्याची परवानगी असली, तरी त्यापेक्षा जास्त दर घेतल्यास संबंधित चालक आणि मालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आरटीओ अधिकारी अर्चना गायकवाड यांनी खासगी बसचालकांना दिला आहे.
गायकवाड यांनी सांगितले की, दिवाळीच्या काळात खासगी बसचालकांनी नियमांचे पालन करावे. एसटीच्या तिकिटापेक्षा दीडपट एवढ्याच दराने तिकीट आकारण्याची परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त दर घेणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित चालक व मालकांविरोधात तत्काळ कारवाई करण्यात येईल.
advertisement
रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनचालकांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहन रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभे करू नये. तसेच वाहनाची सर्व वैध कागदपत्रे जवळ बाळगावीत, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
तक्रार कशी कराल?
प्रवाशांच्या हिताचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असून नियमभंग सहन केला जाणार नाही. प्रवाशांकडून जर तिकीटदरात जादा वसुली झाल्यास त्यांनी त्वरित तक्रार नोंदवावी. त्यासाठी आरटीओने विशेष हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेल जाहीर केले आहेत. नागरिकांनी 8275330101 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा rto.12-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार पाठवावी. तक्रारीसोबत आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि तिकिटाचा फोटो पाठवावा, अशी सूचना आरटीओकडून देण्यात आली आहे.
advertisement
आरटीओच्या या कारवाईमुळे दिवाळीच्या गर्दीत प्रवाशांना होणाऱ्या आर्थिक शोषणावर काही प्रमाणात नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Bus Fare Hike: ऐन दिवाळीत प्रवाशांची लूट, खासगी बस चालकांवर आता थेट कारवाई, हेल्पलाईन नंबर जारी!  
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement