Pune News : पुणेकरांनो खुशखबर! वाहतूक नियम मोडले तरी दंड होणार माफ; जाणून घ्या नेमकं कारण काय?

Last Updated:

Latest News Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून झालेले प्रलंबित दंड आता माफ होणार आहेत, त्यामागचं खरं कारण काय आहे ते जाणून घ्या.

News18
News18
पुणे : पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न वापरणे, सिग्नल तोडणे, चुकीचे पार्किंग किंवा वाहन चालविताना मोबाइल वापरणे अशा छोट्या नियमभंगांवरील प्रलंबित दंड आता मोठ्या सवलतीत भरता येणार आहेत. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त उपक्रमातून 10 ते 13 सप्टेंबरदरम्यान आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत नागरिकांना ही विशेष सुविधा मिळणार आहे.
कुठे आणि कधी दंड भरता येणार?
ही लोकअदालत येरवडा पोस्ट ऑफिसशेजारील वाहतूक शाखा कार्यालयात सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत भरवली जाणार आहे. नागरिकांना आपल्या नावावर असलेल्या प्रलंबित दंडाची थकबाकी मिटविण्याची सुवर्णसंधी यावेळी मिळणार आहे.
कोणते दंड सवलतीत?
सवलत खालील किरकोळ नियमभंगांसाठी लागू असेल –
विनाहेल्मेट दुचाकी चालविणे
सीटबेल्टशिवाय वाहन चालविणे
सिग्नल तोडणे
advertisement
वेगमर्यादा ओलांडणे
चुकीचे पार्किंग
वाहन चालविताना मोबाइलचा वापर
विना परवाना, विना पीयूसी वाहन चालविणे
फिटनेस प्रमाणपत्र नसणे
चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे
नंबरप्लेट नसणे
या सर्व प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने अनेक वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
कोणते दंड माफ नाही?
काही गंभीर गुन्ह्यांवरील दंड मात्र माफ होणार नाहीत. त्यामध्ये –
मद्यपान करून वाहन चालविणे
advertisement
अपघात करून पळ काढणे
निष्काळजीपणे वाहन चालवून प्राणांतिक अपघात घडविणे
अल्पवयीनाने वाहन चालविणे
अनधिकृत शर्यत आयोजित करणे किंवा सहभागी होणे
गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर
न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असलेले गुन्हे
अन्य राज्यातील नियमभंग
यासाठी दंड केवळ कायदेशीर प्रक्रियेनंतरच वसूल केला जाईल.
नागरिकांसाठी फायदा
वाहतूक पोलिसांच्या आवाहनानुसार नागरिकांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा. प्रलंबित दंड सवलतीत भरल्यास आर्थिक भार कमी होईल. तसेच वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती होईल. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हा उपक्रम ती कमी करण्यास मदत करेल.
advertisement
यासोबतच सुरक्षित वाहतूक आणि नियमांचे पालन करण्याचे महत्त्व नागरिकांच्या मनात दृढ करण्याचा उद्देशही साध्य होईल. त्यामुळे या चार दिवसांत अधिकाधिक पुणेकरांनी दंड भरण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुणेकरांनो खुशखबर! वाहतूक नियम मोडले तरी दंड होणार माफ; जाणून घ्या नेमकं कारण काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement