Pune Water Cut: धो धो पावसात पुणेकरांवर जलसंकट, पाणीपुरवठा बंद राहणार, पाहा कधी आणि कुठं?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Pune Water Cut: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऐन पावसाळ्याचा पाण्याचा जपून वापर करावा लागणार असून पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
अभिजित पोते, प्रतिनिधी
पुणे: एकीकडे धो धो पावसाने हैराण केलं असतानाच पुणेकरांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. पुणे महापालिका बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत स्थापत्य विषयक अत्यावश्यक आणि तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे येरवडा, टिंगरेनगर आदी भागातील पाणीपुरवठा गुरुवारी संपूर्ण दिवस बंद राहणार राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
पुण्यातील काही भागात 21 ऑगस्ट रोजी पाणी बंद राहणार आहे. बंडगार्डन पाणीपुरवठा विभागातील अत्यावश्यक आणि तातडीच्या दुरुस्तीची काम हेती घेण्यात आली आहेत. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील. तर शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. या काळात पाणी साठवून ठेवावे आणि काटकसरीने वापरावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
advertisement
पाणीपुरवठा बंद असणारे भाग
view commentsयेरवडा, संगमवाडी, टिंगरेनगर, विद्यानगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, सोमनाथनगर, विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी, नागपूरचाळ, येरवडा कारागृह वसाहत, प्रेस कॉलनी, कल्याणीनगर, धानोरी, कलवड, फुलेनगर, साप्रस, शांतीनगर, प्रतिकनगर, कस्तुरबा वसाहत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 19, 2025 9:07 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Water Cut: धो धो पावसात पुणेकरांवर जलसंकट, पाणीपुरवठा बंद राहणार, पाहा कधी आणि कुठं?


