MCAच्या मतदार यादीत पवार कुटुंबियांची नाव कशी, क्रिकेटर केदार जाधवच्या आरोपांवर रोहित पवारांच सणसणीत उत्तर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सदस्य आणि भाजप पदाधिकारी केदार जाधव यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या बाजूने मतदान व्हावं यासाठी एमसीएची सदस्यसंख्या 154 वरून 571 वर नेल्याचा आरोप केला होता. या आरोपावर आता रोहित पवार यांनी मौन सोडलं आहे.
Rohit Pawar on Kedar Jadhav : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिले होते. या दरम्यान टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सदस्य आणि भाजप पदाधिकारी केदार जाधव यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या बाजूने मतदान व्हावं यासाठी एमसीएची सदस्यसंख्या 154 वरून 571 वर नेल्याचा आरोप केला होता. या आरोपावर आता रोहित पवार यांनी मौन सोडलं आहे.
advertisement
एमसीएच्या निवडणुकीवर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आणल्याच्या मुद्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे मी खोलात जाऊन बोलणार नाही.पण या निवडणुकीत आम्ही कुठलीही गोष्ट बेकायदेशीर केले नाही, असे म्हणत त्यांनी केदार जाधव यांचे आरोप फेटाळून लावले.तसेच पाच वर्ल्डकपच्या मॅचेस आपण आणल्या, एमपीएल त्या ठिकाणी घेतलं,मोठ्या प्रमाणात खेळाडूंना खेळायची संधी दिली. या सर्व गोष्टीमुळे अनेकांनी नोंदणी केली. एका माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं पार पडलंय, त्यामुळे कुठेच काही चुकीचे झाले नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
advertisement
या निवडणुकीत आमचा विरोधी गट आहे जो भाजपमध्ये आहे त्यांनी राजकीय दृष्टीकोनातून विशेष लक्ष आणि ताकद लावल्यामुळे आणि या निवडणुकीत हार स्विकारावी लागल्यामुळे ते आता कोर्टात गेले आहेत,असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.
कुटुंबियांतील नावांच्या नोंदणीच्या आरोपावर रोहित पवार म्हणाले, खरं तर यामध्ये 10-12 लोकं कुटुंबातली असली तर त्याला काही हरकत नसते, असं मला वाटतं. याच्याबाबत माजी न्यायाधीशने काय भूमिका घेतली, हे येत्या काळात तुम्हाला सांगेन. पुर्वी निवडणूक जिंकता यावी यासाठी मुद्दामुन मेंबरशीप कमी ठेवली होती. आता जर 21 जिल्ह्यातील लोकांना आम्ही मेंबरशीप दिली आहे.त्यामुळे उलट व्याप्ती वाढली,असे देखील रोहित पवार यांनी सांगितलं.
advertisement
काही लोक माझ्याबद्दल बोलतात ते उत्कृष्ट खेळाडू आहेत.खेळाडू असल्याने मानसन्मान ठेवावाच लागतो.एखादी संस्था चालवत असताना उत्कृष्ट खेळाडू असणे हे काही प्रमाणात महत्वाचं असतं. पण व्यक्ती म्हणून आपण जीवनात कसं वागतो, कसं बोलतो, कसा आपला स्वभाव आहे,आपल्याला काय सवयी आहे,या देखील बघितल्या जातात,असे म्हणत रोहित पवार यांनी केदार जाधवला प्रत्युत्तर दिले.
advertisement
केदार जाधव एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुमच्यासमोर आव्हान ठरणार का? यावर रोहित पवार म्हणाले, केदार जाधव चांगले बॅटसमन आहेत. ग्राऊंडवर ते चांगले खेळायचे.इथे फक्त केदार जाधव चेहरा आहे.पण त्यांच्या मागे खूप मोठी शक्ती उभी असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 11:19 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
MCAच्या मतदार यादीत पवार कुटुंबियांची नाव कशी, क्रिकेटर केदार जाधवच्या आरोपांवर रोहित पवारांच सणसणीत उत्तर











