'ते स्वत:ला नाना फडणवीसांचा मोठा भाऊ समजत होते पण...'; राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला

Last Updated:

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

News18
News18
पुणे, प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत, यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत? 
'लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना ठीक आहे. पण अनेक भाऊ सध्या बेरोजगार आहेत. उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहेत. पुण्यातील अनेक भाऊ हे नशेच्या आहारी गेले आहेत. गुजरातमधून ड्रग्स पुण्यात येतं. पंजाबच्या बरोबरीनं पुणे हे ड्रग्सचं केंद्र बनलं आहे.  बुलडोझर चालून व्यवहार कमी होणार नाहीत' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. 'महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल काय लागला हे आपण पाहिलं आहे. आम्ही निवडणूक एकत्र लढवणार आहोत. महाविकास आघाडीला शंभर टक्के बहुमत मिळेलं. देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. या राज्यातील जनतेनं त्यांचा पक्ष आणि त्यांचं नेतृत्व झिडकारलं आहे. फडणवीस स्वत:ला नाना फडणवीसांचा मोठा भाऊ समजत होते पण तसं काही नाहीये, नाना फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते. फडणवीसांना त्यात स्थान नाहीये,' असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'ते स्वत:ला नाना फडणवीसांचा मोठा भाऊ समजत होते पण...'; राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement