पुण्याच्या लॉजमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, पत्रात लिहिलं कारण; पोलिस दलात खळबळ

Last Updated:

डेक्कनच्या लॉजमध्ये जाऊन पोलिस अधिकाऱ्याने मृत्यूला कवटाळलं आहे. महत्त्वाचे म्हणजे अवघ्या 25 व्या वर्षी पोलीस दलात सहाय्यक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.

News18
News18
पुणे : पुण्यातून एक खळबळजनक महिती समोर आली आहे. पुण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. डेक्कनच्या एका लॉमध्ये विष प्राशन केल्याने जीवन संपवल्याचे समोर आले आहे. सांगली पोलीस दलात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने टोकाचं निर्णय घेतल्याने पोलीस विभागात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव सूरज मराठे आहे. ते सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहे. आजरपणाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. डेक्कनच्या लॉजमध्ये जाऊन पोलिस अधिकाऱ्याने मृत्यूला कवटाळलं आहे. महत्त्वाचे म्हणजे अवघ्या 25 व्या वर्षी पोलीस दलात सहाय्यक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती.
advertisement

आजारपणामुळे कंटाळले आणि उचललं टोकाचं पाऊल 

सूरज मराठे यांचे कुटुंब देहू येथे वास्तव्यास आहे. ते सध्या सांगली पोलीस दलात कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून गुडघ्यांच्या वेदनांमुळे ते त्रस्त होते. गुडघ्यांच्या दुखण्यामुळे ते उपचारासाठी ते पुण्याला येत होते. गुडघ्यांवरील उपचारासाठी त्यांनी रजा घेतली होती. पुण्यात आल्यानंतर ते उपचारासाठी डेक्कन परिसरातील एका लॉजमध्ये थांबले होते. उपचार केल्यानंतर ते रुमवर आले आणि त्यांनी विष प्राशन करत आयुष्य संपवले.
advertisement

पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली

घटनेच्या ठिकाणी पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली असून, त्यामध्ये आजारपणाचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र चिठ्ठीतील मजकूराबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू असून, आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे सांगली पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याच्या लॉजमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, पत्रात लिहिलं कारण; पोलिस दलात खळबळ
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement