Sharad Mohol : 'मुळशी पॅटर्न'शी शरद मोहोळचं कनेक्शन; 18 वर्षांपासूनचं गँगवॉर आणखी भडकणार?

Last Updated:

मुळशी पॅटर्न हा चित्रपट ज्या संदीप मोहोळच्या आयुष्यावर आधारित होता त्या संदीपच्या गाडीवर शरद ड्रायव्हर म्हणून काम करत होता.

News18
News18
पुणे : गुंड शरद मोहोळ याची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सात दिवसांपूर्वी टोळीत आलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर यानं शरदवर गोळ्या झाडल्या. पुण्यातील या घटनेने पुन्हा एकदा गँगवॉरचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाली करत ८ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मुळशी तालुक्यातल्या मुठा गावचा असणारा शरद मोहोळचे आई वडील शेतकरी होते. मुळशी पॅटर्न हा चित्रपट ज्या संदीप मोहोळच्या आयुष्यावर आधारित होता त्या संदीपच्या गाडीवर शरद ड्रायव्हर म्हणून काम करत होता. शरद हा संदीप मोहोळचा जवळचा नातेवाईक आहे. संदीपची हत्या गाडीतच गोळ्या घालून झाली होती. तेव्हा शरद मोहोळ गाडी चालवत होता.
advertisement
गँगवॉरची ठिणगी 18 वर्षांपूर्वी
२००६ मध्ये पुण्यातील या गँगवॉरची सुरुवात झाली. मारणे गँगच्या सुधीर रसाळला बाबा बोडके गँगमध्ये असणाऱ्या संदीप मोहळने ठार केले होते. या हत्येचा बदला घेताना मारणे गँगने संदीप मोहोळची हत्या केली. गणेश मारणेचा यामागे हात होता.
advertisement
संदीप मोहोळची हत्या
संदीप मोहोळ गाडीतून जाताना त्याची गाडी अडवून काचा फोडण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर गोळ्या घातल्या होत्या. तेव्हा शरद मोहोळ संदीपची गाडी चालवत होता. संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळची गुन्हेगारी जगतात एन्ट्री झाली. त्यानंतर पुण्यात गँगवॉर वाढले.
संदीपच्या हत्येचा बदला
शरद मोहोळने संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी २०१० मध्ये किशोर मारणेची हत्या केली. या प्रकरणी न्यायालयाने शरद मोहोळला जन्मठेपही सुनावली होती. या प्रकरणात तो जामिनावर बाहेर होता.
advertisement
शरद मोहोळची हत्या
शरद मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवशीच त्याची हत्या करण्यात आलीय. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी निघाला होता. त्यावेळी त्याच्या टोळीत सामील झालेल्या तिघांनी गोळीबार केला. वाहनातून मंदिराकडे जाण्याआधी झालेल्या या गोळीबारात शरद मोहोळ गंभीर जखमी झाला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला
advertisement
कोण आहे शरद मोहोळ?
हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण यासारखे गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पोलिसांनी त्याला अनेकदा अटकही केली. तो गुन्हा केल्यानंतर तुरुंगात जायचा आणि जामिनावर बाहेर यायचा. २०१२ मध्ये जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील संशयित दहशथवादी महम्मद कातिल महम्मद जाफर सिद्दिकीची नाडीने गळा आवळून हत्या केली होती. या प्रकरणात सबळ पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका झाली होती.
advertisement
पत्नीचा राजकारणात प्रवेश
गुन्हेगारी विश्वातून तो राजकारणातही शिरकाव करण्याच्या तयारीत होता. सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये तो उपस्थितीही लावत असे. विशेष म्हणजे २०११ मध्ये त्याने तुरुंगात बसून गावची निवडणूक बिनविरोध करत स्वत: सरपंच झाला होता. तर गेल्या वर्षी शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मराठी बातम्या/पुणे/
Sharad Mohol : 'मुळशी पॅटर्न'शी शरद मोहोळचं कनेक्शन; 18 वर्षांपासूनचं गँगवॉर आणखी भडकणार?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement