Sharad Mohol murder : सिनेमाला लाजवेल असं शरद मोहोळला संपवलं, हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? महत्त्वाची माहिती समोर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केला.
पुणे, (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची पुण्यात दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शरद मोहोळ याच्यावर त्याच्या घराजवळच कोथरुडच्या सुतारदरा भागात शुक्रवारी गोळ्यांचे चार राऊंड फायर करण्यात आले. गोळीबारानंतर मोहोळला कोथरुडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर आता आरोपींबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपी हा मोहोळ गँगचा सदस्य असून तो शरद मोहोळसोबत राहत होता.
गोळीबारापूर्वी नेमकं काय घडलं होतं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केला. शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना पोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता. टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबत होता. पैशांच्या देवाणघेवाणीतून दोघांमध्ये वाद देखील उडाला होता. घटना घडली त्यावेळी सकाळपासूनच हल्लेखोर हे शरद मोहोळ याच्यासोबत होते. संधी मिळताच त्यांनी मोहळ याच्यावर गोळीबार केला. मोहोळ याच्यावर त्याच्या घराजवळच कोथरुडच्या सुतारदरा भागात गोळ्याचे चार राउंड फायर करण्यात आले. या घटनेत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
advertisement
आठ आरोपींना अटक
दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 9 पथकं पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना केली. यादरम्यान पुणे-सातारा रोडवर किकवी-शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयीत स्विफ्ट गाडीचा पाठलाग करण्यात आला. यानंतर पोलिसांनी 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राऊंड आणि दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
January 06, 2024 10:05 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Sharad Mohol murder : सिनेमाला लाजवेल असं शरद मोहोळला संपवलं, हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? महत्त्वाची माहिती समोर