Ajit Pawar Death : अजित पवार यांचा अपघाती मृत्यू, शरद पवार ब्रीज कॅन्डी हॅास्पिटलमध्ये! कशी कळली निधनाची बातमी?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sharad Pawar On Ajit Pawar death : शरद पवार यांना ब्रीज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं शरद पवार यांना याबद्दलची माहिती देण्यात आली. त्यांना धक्का सहन झाला नाही तर... अशी भीती व्यक्त केली जात होती.
Ajit Pawar Death News : बारामतीमध्ये विमान लँडिंग करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अंदाजे पावणे नऊच्या सुमारास अजित पवार यांचा अपघात झाला. त्यानंतर अजित पवार यांचा काही वेळातच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मात्र, याची माहिती शरद पवार यांना लगेच देण्यात आली नाही. शरद पवारांना सर्वात उशिरा माहिती देण्यात आल्याचं समजतंय.
शरद पवार ब्रीज कॅन्डी रुग्णालयात
सर्वात आधी शरद पवार यांना ब्रीज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं शरद पवार यांना अजित पवारांच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. त्यांना धक्का सहन झाला नाही तर... अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळेच काळजीपोटी हे करण्यात आले आहे. आता शरद पवार पुन्हा सिल्वर ओकवर आले आहेत. त्यानंतर आता दुपारी ते बारामतीला रवाना होतील.
advertisement
अपघाताचे नेमकं कारण काय?
अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जात आहे. ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.
अजित पवार यांच्या चार सभा होत्या
advertisement
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळी विमान निघालं होतं. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य सहाजण देखील विमानात होते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 11:57 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Death : अजित पवार यांचा अपघाती मृत्यू, शरद पवार ब्रीज कॅन्डी हॅास्पिटलमध्ये! कशी कळली निधनाची बातमी?









