Pune News : पुणे-नगर महामार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी PMRDA चा मोठा निर्णय, या तारखेनंतर थेट धडक कारवाई करणार

Last Updated:

Shirur News : शिरूर तालुक्यात पुणे-नगर महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पीएमआरडीएने मोठी मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्याचे आवाहन करण्यात आले असून, दिलेल्या मुदतीनंतर थेट धडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

News18
News18
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कठोर पाऊल उचलले आहे. या मार्गावरील अतिक्रमणे लवकरच हटवली जातील. त्यामुळे नागरिकांना साधारण 24 ऑक्टोबरपर्यंत स्वतःहून अतिक्रमणे काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर या वेळेपर्यंत अतिक्रमणे काढली नाहीत तर प्राधिकरणाने ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्या वाढल्यामुळे नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली होती. यानंतर PMRDA ने स्थानिक प्रशासन आणि शासकीय यंत्रणांबरोबर मिळून अतिक्रमण हटवण्याची तयारी सुरू केली आहे. अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आढावा बैठकीत शिरूर, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव गणपती परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणांवर चर्चा करण्यात आली. जड वाहन वाहतूक, वाहतुकीतील अडथळे आणि अतिक्रमणे यावर उपाययोजना करण्यासाठी या महिन्याच्या 24 ऑक्टोबरनंतर अतिक्रमणमुक्त नगर रोड मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
ही मोहीम राबविल्याने महामार्गावरील वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होईल आणि नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित होईल. यासाठी नागरिक, व्यापारी आणि स्थानिक प्रशासनाला PMRDA ने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच या मोहिमेमुळे रस्त्यावरील जाम, वाहतुकीतील त्रास आणि अपघातांच्या शक्यता कमी होतील. नागरिकांनी वेळेत अतिक्रमणे काढून दिल्यास त्यांना भविष्यातील कारवाईची टाळता येईल. PMRDA ची ही मोहीम शिरूर तालुक्यातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाची पाऊल ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुणे-नगर महामार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी PMRDA चा मोठा निर्णय, या तारखेनंतर थेट धडक कारवाई करणार
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement