Vasant More : पुणे महापालिका निवडणुकीआधी वसंत मोरेंची शरद पवारांना ऑफर, तात्यांनी थेट पुण्याचं गणित मांडलं!

Last Updated:

Pune Municipal Election 2025 : शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांनी जर एकत्रित निवडणूक लढवली तर एक वेगळं गणित पहायला मिळू शकतं, असं मत वसंत मोरे यांनी मांडलं आहे.

Vasant More offer Sharad Pawar over mahayuti
Vasant More offer Sharad Pawar over mahayuti
Vasant More offer Sharad Pawar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि पुण्यातील डॉशिंग चेहरा असलेल्या वसंत मोरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माजी नगरसेवक वसंत मोरे यांची शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने महापालिका निवडणूक समन्वयक म्हणून निवड केली होती. अशातच आता वसंत मोरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीआधी मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले वसंत मोरे?

लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. पुणे शहराची गणित ही इतरांपेक्षा वेगळं आहे. 2017 च्या निवडणुकीत सगळे पक्ष वेगळेवेगळे लढले होते. त्यावेळी शिवसेनाला 8 लाख 73 हजार मतदान झालं. मनसेला 3 लाख 23 हजार मतदान झालं. काँग्रेसला 5 लाख 26 हजार मतदान झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसला 13 लाख मतदान झालं. तर भाजपला 22 लाख मतदान झालं होतं. याची सगळी जुळवाजुळव केली तर शिवसेना, मनसे आणि शरद पवारांचा गट अशी युती केली तर 18 लाख मतदान होतं, असं गणित वसंत मोरे यांनी मांडण्याचा प्रयत्न केला.
advertisement

जर एकत्रित निवडणूक लढवली तर...

भाजपच्या मतदानापेक्षा हे मतदान अधिक होतं. तरी देखील काँग्रेसला पकडलं नाही. स्थानिक कॉग्रेसची अशीच इच्छा व्हावी की पुण्यात युती व्हावी, पण काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांची केंद्राची भूमिका वेगळी असेल. बिहारची निवडणूक पाहता वाटत नाही की काँग्रेस युती करेल. पण शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांनी जर एकत्रित निवडणूक लढवली तर एक वेगळं गणित पहायला मिळू शकतं, असं मत वसंत मोरे यांनी मांडलं आहे.
advertisement

पुण्यात महाविकास आघाडी सत्तेच्या दारात

मनसे आणि शिवसेना यांची युती झाल्यात जमा आहे. राहतोय फक्त शरद पवार यांचा पक्ष... जर असं झालं तर महाविकास आघाडी सत्तेच्या दारात जाऊ शकते, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. व्हिडीओ शेअर करत वसंत मोरे यांनी आपलं मत नोंदवलं आहे. वसंत मोरे यांनी आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी थेट राष्ट्रवादीला ऑफर दिल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
advertisement

राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी

दरम्यान, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक साठीची अंतिम प्रभागरचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली असून, ही प्रभाग रचना शनिवारी जाहीर करण्यात आली. प्रारूप प्रभागरचनेवर नोंदविण्यात आलेल्या तब्बल ५ हजार ९२२ हरकतींपैकी १ हजार ३२९ पूर्णत: मान्य तर ६९ हरकती अंशत: मान्य करण्यात आल्या आहेत. ४ हजार ४२४ हरकती फेटाळण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या/पुणे/
Vasant More : पुणे महापालिका निवडणुकीआधी वसंत मोरेंची शरद पवारांना ऑफर, तात्यांनी थेट पुण्याचं गणित मांडलं!
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement