Vasant More : 'परिणाम तर भोगावे लागतील ना...', कात्रज हातातून गेल्यावर वसंत तात्यांची पोस्ट व्हायरल, एका वाक्याची चर्चा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Vasant More Post After loss Election : कात्रजमध्ये व्यंकोजी खोपडे यांनी मोरे यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला असून, राजकीय वर्तुळात त्यांची 'जायंट किलर' म्हणून चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता वसंत मोरेंची पोस्ट व्हायरल होतीये.
Pune katraj Vasant More : पुणे महानगरपालिका पोटनिवडणुकीच्या निकालाने कात्रज परिसरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. ठाकरे गटाचे दिग्गज नेते आणि आक्रमक वक्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत मोरे यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व्यंकोजी खोपडे यांनी मोरे यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला असून, राजकीय वर्तुळात त्यांची 'जायंट किलर' म्हणून चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता वसंत मोरेंची पोस्ट व्हायरल होतीये.
परिणाम तर भोगावे लागतील ना...
"कात्रजच्या जनतेने त्यांना जमिनीवर आणलं" असं सांगत त्यांनी मोरे यांच्या पराभवावर भाष्य केलं. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी निवडणुकीवर भाष्य केलं. चार वर्ष पुणे शहरात कोणतेही पद नसताना 2022 ते 2026 गरीब मायबाप जनतेचा आधार बनून होतो आणि आता तर 20 हजार 867 पीडित, शोषित, प्रमाणिक जनतेने आशीर्वाद दिला आहे परिणाम तर भोगावे लागतील ना..., असं वसंत मोरे पोस्ट करत म्हणाले आहेत. अखेरच्या ओळीत वसंत मोरे यांनी 'परिणाम तर भोगावे लागतील ना...', असं म्हटल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
चार वर्ष पुणे शहरात कोणतेही पद नसताना 2022 ते 2026 गरीब मायबाप जनतेचा आधार बनून होतो आणि आता तर 20 हजार 867 पीडित, शोषित, प्रमानिक जनतेने आशीर्वाद दिला आहे परिणाम तर भोगावे लागतील ना... pic.twitter.com/xR6XoJNh0o
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) January 17, 2026
advertisement
अखेरच्या टप्प्यात भाजपची मुसंडी
दरम्यान, या अटीतटीच्या लढतीत व्यंकोजी खोपडे यांनी वसंत मोरे यांचा 1100 मतांनी पराभव केला आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच या मतदारसंघात चुरस पाहायला मिळत होती, मात्र अखेरच्या टप्प्यात भाजपने मुसंडी मारली. विजयानंतर माध्यमांशी बोलताना खोपडे यांनी आपल्या यशाचे श्रेय थेट मतदारांना दिलं. वसंत मोरे यांच्यावर निशाणा साधताना खोपडे यांनी त्यांना कडक शब्दांत टोला लगावला.
advertisement
दुसरीकडे, वसंत मोरेच्या लेकाचा घरच्या मैदानावर सपाटून पराभव झाला आहे. भाजप उमेदवार रंजना कुंडलिक टिळेकर यांनी प्रभाग क्रमांक 40 (ड) मधून विजय मिळवला आहे. रंजना टिळकर यांना 25859 मतं मिळाली. रंजना टिळकर आणि रुपेश मोरे यांच्यात तगडी फाईट पहायला मिळाली होती. मात्र, अखेरच्या काही मोजणीमध्ये रुपेश मोरे पिछाडीवर आल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे पहिल्याच निवडणुकीत रुपेश मोरे यांना पराभवाचं तोंड पहायला लागलं आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 10:32 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Vasant More : 'परिणाम तर भोगावे लागतील ना...', कात्रज हातातून गेल्यावर वसंत तात्यांची पोस्ट व्हायरल, एका वाक्याची चर्चा!









