Pune : शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षिकेचे काळे कारनामे, पुण्याच्या शाळेत पोहोचलेले अधिकारीही धक्क्यात

Last Updated:

शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिळवलेल्या पुण्यात एका महिला शिक्षिकेने शाळेत काळे कारनामे केले आहेत.

शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षिकेचे काळे कारनामे, पुण्याच्या शाळेत पोहोचलेले अधिकारीही धक्क्यात (Meta AI Image)
शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षिकेचे काळे कारनामे, पुण्याच्या शाळेत पोहोचलेले अधिकारीही धक्क्यात (Meta AI Image)
पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिळवलेल्या पुण्यात एका महिला शिक्षिकेने शाळेत काळे कारनामे केले आहेत. शिक्षिका म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ही महिला स्वत: शिकवायला जाण्याऐवजी दुसऱ्या महिलेला शाळेत पाठवायची. शाळेमध्ये असलेल्या शिक्षकांच्या हजेरीपटामध्येही या महिलेच्या खोट्या सह्या आढळल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये ही घटना घडली आहे. महिलेने केलेला हे प्रताप लक्षात येताच तिला निलंबित करण्यात आलं आहे.
सीईओ गजानन शिंदे आणि प्रशासकीय अधिकारी राजकुमार बामने भोरच्या महाराणा प्रताप शाळा क्रमांक एकमध्ये अचानक निरीक्षण करायला पोहोचले, तेव्हा शाळेमध्ये नियुक्त महिला शिक्षिका भारती मोरे कोणतीही पूर्वसूचना न देता सुट्टीवर होत्या, पण शिक्षकांच्या हजेरी पटावर त्यांची सही होती. ही सही खोटी असल्याचंही अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता समोर आलं.
आरोपी महिला शिक्षिकेचं नाव भारती दीपक मोरे असं आहे. अनुपस्थित महिला शिक्षिकेच्या ऐवजी शाळेमध्ये दुसरी महिला शिकवत असल्याचं तपासात समोर आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भारती मोरेने नियुक्त केलेल्या महिलेला ठराविक पैसे द्यायची ऑफर दिली होती, याबदल्यात त्या महिलेला भारती मोरेऐवजी शाळेत जाऊन शिकवायचं होतं. याप्रकरणी शालेय अधिकाऱ्यांनी भारती मोरेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, पण या नोटीसला समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे भारती मोरे यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
advertisement
कामावर अनधिकृतरित्या गैरहजर राहणे, कारण न देता मुख्यालय सोडणे, जबाबदारी प्रती निष्काळजीपणा दाखवणे, अनधिकृत व्यक्तीला स्वत:च्या कामाची जबाबदारी देणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करणे तसंच शाळेच्या वर्गाची चावी अनधिकृत व्यक्तीला देणे, या आरोपांखाली महिला शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षिकेचे काळे कारनामे, पुण्याच्या शाळेत पोहोचलेले अधिकारीही धक्क्यात
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement