Holi 2024 : धुलिवंदन आणि होळी नक्की कधी आहे? वाचा तारीख ते शुभ मुहूर्त
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
होळीचा दिवस दानव राजा हिरण्यकश्यपू, विष्णुभक्त प्रल्हाद आणि राक्षसी होलिका यांच्याशी संबंधित आहे. असं मानलं जातं की, एकेकाळी हिरण्यकश्यपू नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करत होता. तो भगवान विष्णूंचा कट्टर विरोधक होता.
मुंबई : आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण-समारंभाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जानेवारी महिन्यात साजरा केल्या जाणाऱ्या मकरसंक्रांतीच्या सणापासून नवीन वर्षातील (इंग्रजी कॅलेंडरनुसार) सण-समारंभांची सुरुवात होते. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच फाल्गुन पौर्णिमेला होळी (Holi 2024) हा सण साजरा केला जातो. यंदा होलिका दहन 24 मार्चला होणार असून, दुसऱ्या दिवशी 25 मार्चला धुलिवंदन साजरं केलं जाईल. 24 मार्च रोजी रात्री 11 वाजून 13 मिनिटांपासून ते 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल. दरवर्षी फाल्गुन महिन्यात साजऱ्या होणाऱ्या होळीच्या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
होळीची संपूर्ण माहिती आणि कथा (Holi Information In Marathi)
होळीचा दिवस दानव राजा हिरण्यकश्यपू, विष्णुभक्त प्रल्हाद आणि राक्षसी होलिका यांच्याशी संबंधित आहे. असं मानलं जातं की, एकेकाळी हिरण्यकश्यपू नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करत होता. तो भगवान विष्णूंचा कट्टर विरोधक होता. पण, त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूंचा भक्त होता. तो रात्रंदिवस विष्णुची पूजा करत असे. मुलगा विष्णूभक्त असल्यामुळे हिरण्यकश्यपू त्रस्त झाला होता. त्याने अनेकदा प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न केला; पण प्रत्येक वेळी तो अयशस्वी झाला.
advertisement
एकदा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याची जबाबदारी आपली बहीण होलिकेला दिली. होलिकेनी प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्याचे आदेश हिरण्यकश्यपूने दिले. कारण, होलिका अग्नीत न बसली तरीही तिला काहाही होणार नाही असं वरदान तिने मिळवलं होतं. पण, भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका आगीच्या ज्वाळांमध्ये भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहन हा दिवस चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांनी होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन म्हणतात.
advertisement
महाराष्ट्रामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी होळीतील राखेनी एकमेकांना रंगवलं जातं. रंगपंचमीदिवशी महाराष्ट्रात रंगांची उधळण होते आणि रंगपंचमी साजरी होते. उत्तर भारतात होळीची मोठी परंपरा आहे. ऐतिहासिक शहर असलेल्या झाशीमध्येही होळीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात रंगांची उधळण होते.
होलिका दहन मंत्र (Holika Dahan Mantra In marathi)
view commentsहोलिका दहनाच्या दिवशी 'ॐ त्र्यंबकम यजमाहे सुगंधीं पुष्टीवर्धनम्'. 'उर्वारुकमिव बंधनं मृत्युोर्मक्षिय ममृतात्' या मंत्राचा जप करावा. या शिवाय होलिका दहनावेळी गायत्री मातेचा महामंत्र 'ॐ भुर्भुव: स्वा: तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात' या मंत्राचाही जप करावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 19, 2024 11:26 AM IST


