Tulsi Vivah 2023: तुळशी विवाह कसा करायचा? काय-काय साहित्य लागतं, पहा पूजा-विधी परंपरा

Last Updated:

Tulsi Vivah 2023: विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यत: द्वादशीला करतात. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते, असे मानले जाते.

News18
News18
मुंबई, 24 नोव्हेंबर : तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीला श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकत्र करण्याची परंपरा आहे. आता आपण तुळशी विवाह कसा करतात आणि त्यासाठी लागणारं साहित्या पाहुया.
तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामध्ये अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यत: द्वादशीला करतात. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते, असे मानले जाते.
advertisement
तुळशी विवाह कसा करावा -
घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची-तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात. त्यावर बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो.
advertisement
कर्त्या व्यक्तीनं (स्त्री/पुरुष) यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा, असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे. त्यानंतर फटाके फोडून आनंद साजरा करण्याची परंपरा आहे.
advertisement
तुळशी विवाहासाठी तुळशीच्या समोर मेहंदी, फुले, चंदन, सिंदूर, श्रृंगार साहित्य (मेकअप साहित्य), तांदूळ आणि मिठाई पूजेच्या साहित्याच्या स्वरूपात ठेवली जाते. तुळशी वृंदावनाच्या शेजारी छानशी रांगोळी काढली जाते. या तुळशीविवाहासाठी काही वस्तू असणे आवश्यक असते. पहा यादी.
पूजेत या वस्तू अर्पण करा -
पूजेमध्ये मुळा, रताळे, शिंगाडा, आवळा, मनुका, कोथिंबीर, पेरू आणि इतर हंगामी फळे अर्पण करा.
advertisement
या गोष्टी पूजेत अवश्य असाव्या -
एकादशीला पूजास्थळी मंडप उसाने सजवला जातो. भगवान विष्णूची मूर्ती खाली विराजमान करून भगवान विष्णूला मंत्रांनी जागृत करण्यासाठी पूजा केली जाते.
तुळशी विवाह कथा -
पौराणिक कथेनुसार, एकदा माता तुळशीने भगवान विष्णूंना क्रोधाने शाप दिला की, तू काळा दगड होशील. या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवाने शाळीग्राम पाषाणाच्या रूपात अवतार घेतला आणि तुळशीशी विवाह केला, असे मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Tulsi Vivah 2023: तुळशी विवाह कसा करायचा? काय-काय साहित्य लागतं, पहा पूजा-विधी परंपरा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement