Navratri 2025: चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रामध्ये काय फरक? पूजेच्या विधी, गुप्त नवरात्र कधी आहे

Last Updated:

Navratri 2025 Date and Shubh Muhurat: दरवर्षी माघ, चैत्र, आषाढ, अश्विन या महिन्यांत चार नवरात्र असतात. चार नवरात्रांपैकी दोन प्रकट आणि दोन गुप्त नवरात्र असतात. यापैकी चैत्र व अश्विन महिन्यांत प्रकट नवरात्र साजरं केलं जातं.

Navratri 2025 Date: चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रामध्ये काय फरक? पूजेच्या विधी, गुप्त नवरात्र कधी आहे
Navratri 2025 Date: चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रामध्ये काय फरक? पूजेच्या विधी, गुप्त नवरात्र कधी आहे
मुंबई : हिंदुधर्मात अनेक उत्सव उल्हासाने साजरे केले जातात. दिवाळी सगळ्यात मोठा सण असतो तर दसर्‍यालाही विशेष महत्त्व असतं. तसंच हिंदुंमध्ये नवरात्राला खूप जास्त महत्त्व आहे. आज आपण चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रामध्ये काय फरक आहे ते जाणून घेणार आहोत. तसेच गुप्त नवरात्र काय असतं? नवरात्राची महत्त्व काय, ती कोण साजरी करतं, शुभ-अशुभ वेळ काय असते तेही जाणून घेऊयात.
चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रामध्ये काय फरक
दरवर्षी माघ, चैत्र, आषाढ, अश्विन या महिन्यांत चार नवरात्र असतात. चार नवरात्रांपैकी दोन प्रकट आणि दोन गुप्त नवरात्र असतात. यापैकी चैत्र व अश्विन महिन्यांत प्रकट नवरात्र साजरं केलं जातं. पौष आणि आषाढ महिन्यातील नवरात्राला गुप्त नवरात्र म्हणतात. नवरात्रात दुर्गामातेची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे. केवळ चैत्र आणि शारदीय नवरात्र ही गृहस्थ आणि कौटुंबिक जीवन जगणाऱ्यांसाठी शुभ मानली जाते. दोन्हींमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दोन्ही नवरात्रांच्या उपासनेची पद्धत जवळपास सारखीच आहे, पण दोन्हींचे व्रत पाळण्यात फरक आहे आणि दोन्हींचेही महत्त्व वेगळे आहे.
advertisement
चैत्र नवरात्रीचे महत्त्व (Importance of  Chaitra Navratri)
चैत्र शुक्ल पक्षात चैत्र नवरात्र साजरं केलं जातं. हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो. मराठी लोक हा सण गुढीपाडवा म्हणून साजरा करतात. तर काश्मिरी हिंदू ‘नवरे’ म्हणून आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील हिंदू तो ‘उगादी’ म्हणून साजरा करतात. हा नऊ दिवसांचा उत्सव, ज्याला ‘रामाचं नवरात्र’ असंही म्हटलं जातं, भगवान रामाच्या जन्मदिवस ‘रामनवमी’ या दिवशी हे नवरात्रं समाप्त होतं. चैत्र नवरात्राला देवीची आराधना केल्याने लोक मानसिकदृष्ट्या मजबूत होतात आणि आध्यात्मिक इच्छा पूर्ण होतात, असं मानलं जातं.
advertisement
शारदीय नवरात्राचे महत्त्व (Importance of  Shardiya Navratri)
वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्र साजरे केले जाते. नऊ दिवसांच्या दीर्घ युद्धानंतर महिषासुर राक्षसाचा देवी दुर्गेने वध केला होता आणि त्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. शारदीय नवरात्राबद्दल सांगितलेली आणखी एक कथा अशी आहे की, युद्धात रावणाचा पराभव करण्यासाठी भगवान रामाने दुर्गा देवीच्या सर्व नऊ रूपांची पूजा केली. यानंतर भगवान रामाने दहाव्या दिवशी रावणाचा वध केला, जो आपण दसरा म्हणून साजरा करतो.
advertisement
चैत्र नवरात्रीच्या तारखा व शुभ मुहूर्त (Chaitra Navratri 2025 Date and Muhurat)
पंचांगानुसार, 2025 मध्ये चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीची सुरुवात 29 मार्चला दुपारी 4:27 वाजता सुरू होईल आणि तिथी 30 मार्च रोजी दुपारी 12:49 वाजता समाप्त होईल. चैत्र नवरात्र 30 मार्चला सुरू होऊन 7 एप्रिलला संपणार आहे. घटस्थापनेसाठी 30 मार्च रोजी सकाळी 06:13 ते 10:22 पर्यंत शुभ मुहूर्त आहे.
advertisement
शारदीय नवरात्राच्या तारखा व शुभ मुहूर्त (Shardiya Navratri 2025 Date and Muhurat)
2025 मध्ये शारदीय नवरात्राची सुरुवात 22 सप्टेंबर रोजी पहाटे 1:23 वाजता होईल. नवरात्र 22 सप्टेंबर रोजी सुरू होईल व 2 ऑक्टोबर 2025 रोजी समाप्त होईल. घटस्थापनेचा मुहूर्त 22 सप्टेंबर रोजी सकाळी 06:09 ते 08:06 पर्यंत आहे आणि घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त सकाळी 11:49 ते 12:38 पर्यंत आहे.
advertisement
चैत्र नवरात्र पूजा विधी (Chaitra Navratri 2025 Puja Vidhi)
घटस्थापनेपूर्वी पूजेची जागा स्वच्छ करावी. घटस्थापनेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. शुभ मुहूर्तावर सकाळीच घटस्थापना करावी, त्यासाठी मातीच्या कलशमध्ये पाणी भरावे. त्यात हळद, अक्षता आणि नाणं टाकावं. नंतर पीपळ, अशोक, आंबा, वटवृक्ष अशी पाच प्रकारची पान ठेवा. तो कलश मातीच्याच भांड्याने झाका, त्यावर नारळ ठेवा. देवीची स्थापना करा. जवस पेरा, अखंड ज्योत नऊ दिवस ठेवा. ताजी फुलं आणि पूजा करात. धूप, दिवा, पंचामृत अर्पण करा आणि आरती करा.
advertisement
शारदीय नवरात्र पूजा विधी (Shardiya Navratri 2025 Puja Vidhi)
हिंदू धर्मात नवरात्रात कलश स्थापनेला विशेष महत्त्व आहे. कलश हे दैवी शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्याची स्थापना शुभ, समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. कलश एका विशिष्ट ठिकाणी ठेवला जातो आणि त्यात पाणी, नारळ, आंब्याची पाने आणि इतर पवित्र वस्तू ठेवल्या जातात. कलशाची स्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. कलशाजवळ नऊ दिवस पूजा केली जाते. व्रत पाळले जाते. भक्त दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात, यामुळे भक्तांच्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते.
चैत्र नवरात्रामध्ये काय चुका करू नये, काय करावं म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होईल -
  • नवरात्रामध्ये लोक भक्तीभावाने देवाची पूजा आणि उपवास करतात. मात्र, याचदरम्यान त्यांच्या हातातून अशा काही चुका होतात की त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होत नाही.
  • मद्यपान करू नये - नवरात्रात मद्यप्राशन करू नये.
  • मांसाहार करू नये - 9 दिवसांत दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. हे 9 दिवस देवीभक्त उपवास ठेवतात आणि देवीची पूजा करतात. त्यामुळे नवरात्रीत मांसाहार करू नये. सात्विक आहार घ्यावा आणि देवीची पूजा करावी.
  • केस, नखं कापू नयेत- धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रात केस कापू नये, नखंही कापू नये. याचा नकारात्मक प्रभाव पडतो.
  • अपमान करू नये - नवरात्रात कुणाचा अपमान, अनादर करू नये. शिवीगाळ, अपशब्द बोलू नयेत. असे केल्याने देवी क्रोधित होते आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.
  • दान धर्म करा - नवरात्रात दान करणे शुभ मानले जाते. नवरात्रात दान केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते.
  • नऊ दिवस उपवास ठेवा.
  • देवीची स्थापना करून दिवा लावा.
  • 'ओम ह्रीं क्लीम चामुंडायै विचराय' या मंत्राचा जप करा.
  • दुर्गा सप्तशती पाठ करावा.
  • लाल रंगाच्या आसनावर बसून पूजा करा.
  • पूजेच्या वेळी लाल रंगाचे कपडे परिधान करून लाल टिळा लावा.
  • अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कन्यापूजन करा.
गुप्त नवरात्र म्हणजे काय?
गुप्त नवरात्र माघ आणि आषाढ महिन्यात येते. गुप्त नवरात्रात दुर्गा मातेची पूजा केल्यानं व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात. गुप्त नवरात्रामध्ये दुर्गा मातेची गुप्तपणे पूजा केली जाते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी माता दुर्गा कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येते. तिच्या आगमनाचे वाहन दिवसानुसार ठरवले जाते आणि त्यावरून शुभ किंवा अशुभ संकेत मानले जातात.
गुप्त नवरात्राचे महत्त्व, कोण साजरे करते
गुप्त नवरात्राच्या दिवसांमध्ये दुर्गा देवीची स्थापना होत नाही. हे नवरात्र तंत्र-मंत्र आणि साधकांसाठी विशेष असतं. गुप्त नवरात्रीत एखाद्या विशेष मनोकामनेच्या पूर्तीसाठी, तंत्र साधना करण्यासाठी व्रताचरण केले जाते. गुप्त नवरात्रीत तप, साधना केल्यास दुर्मिळ सिद्धी प्राप्त होऊ शकते अशी मान्यता आहे.
गुप्त नवरात्र शुभ-अशुभ वेळा
  • माघ गुप्त नवरात्र: 30 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2025
  • आषाढ गुप्त नवरात्र: 26 जून ते 4 जुलै 2025
माघ गुप्त नवरात्र शुभ मुहूर्त
  • 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9:25 ते 10:46 वाजेपर्यंत
  • अभिजित मुहूर्त: दुपारी 12:13 ते 12:56 वाजेपर्यंत
आषाढ गुप्त नवरात्र शुभ मुहूर्त
  • 26 जून 2025 रोजी सकाळी 5:28 ते 7 वाजेपर्यंत
  • अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:52 ते 12:47 वाजेपर्यंत
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Navratri 2025: चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रामध्ये काय फरक? पूजेच्या विधी, गुप्त नवरात्र कधी आहे
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement