advertisement

Shardiya Navratri 2023: नवरात्रीत उपवास करणार असाल तर या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष

Last Updated:

Shardiya Navratri 2023: रविवार 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रामध्ये उपवास करून माता जगदंबेच्या नऊ रूपांची 9 दिवस पूजा केल्याने मनुष्याला सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते.

नवरात्रीचा उपवास
नवरात्रीचा उपवास
मुंबई, 12 ऑक्टोबर : सनातन धर्मात नवरात्रीचा उत्सव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पंचांगानुसार नवरात्रीचे व्रत वर्षातून चार वेळा केले जाते. त्यात एक चैत्र नवरात्र, दोन गुप्त नवरात्र आणि एक शारदीय नवरात्र यांचा समावेश आहे. या वेळेस रविवार 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रामध्ये उपवास करून माता जगदंबेच्या नऊ रूपांची 9 दिवस पूजा केल्याने मनुष्याला सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते.
जर तुम्हीही नवरात्राचं व्रत करत असाल तर या काळात काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नवरात्रामध्ये कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं? याबद्दल अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, नवरात्रामध्ये जगदंबेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्राच्या काळात देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. या शिवाय नवरात्रात काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून तुमचा उपवास खंडित होऊ नये आणि तुम्हाला तुमच्या व्रताचा पूर्ण लाभ मिळू शकेल.
advertisement
कलशची प्रतिष्ठापना करा
नवरात्राच्या काळात पहिल्या दिवशी कलशाची प्रतिष्ठापना करून नवरात्राचा उपवास करण्याचा संकल्प करा. नवरात्राच्या पहिल्या दिवशी कलशाची प्रतिष्ठापना करावी. ही प्रतिष्ठापना प्रतिपदेला केली जाते.
दररोज अखंड ज्योत लावा
शारदीय नवरात्रीचं व्रत ठेवल्यास नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीपासून दशमी तिथीपर्यंत दररोज अखंड ज्योत प्रज्ज्वलित करावी. दररोज अखंड ज्योत प्रज्ज्वलित केल्याने दुर्गामाता प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता आहे.
advertisement
रोज आरती करा
नवरात्रीच्या काळात सकाळ-संध्याकाळ दुर्गामातेची आरती करावी आणि तिच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा, असं केल्यास देवी तुमच्यावर प्रसन्न होईल.
नवरात्रामध्ये या वस्तू अवश्य अर्पण करा
नवरात्रीचा उपवास 9 दिवस केला जातो ज्यामध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्याचा नियम आहे, अशा स्थितीत नवरात्राच्या वेगवेगळ्या दिवशी जगदंबेला लाल वस्त्र अर्पण करावीत, लाल फुलं अर्पण करावीत.असं केल्याने दुर्गामातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
advertisement
या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
नवरात्रात काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नवरात्राच्या काळात घराची स्वच्छता केलीच पाहिजे. शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ असले पाहिजे. उपवासावेळी देवीची पूजा विधीनुसार करावी.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shardiya Navratri 2023: नवरात्रीत उपवास करणार असाल तर या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement