Gudi Padwa: नववर्षाच्या स्वागताला बाप्पांचं दर्शन, पाडव्याला दगडूशेठ गणपती मंदिरात अलोट गर्दी
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Dagdusheth Ganpati: हिंदू नववर्ष गुढीपाडवा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीये.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा सण आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पुणे शहरभर जल्लोषाचे वातावरण असून, सकाळपासूनच विविध ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात शहरातील प्रमुख रस्त्यांवर मिरवणुका काढण्यात आल्या. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.
advertisement
गुढीपाडव्याच्या निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक फुलांची आणि फळांची देखील भव्य सजावट करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झालीये. नववर्षाचा संकल्प करत अनेक भाविक मंदिरात आले आहेत. अगदी पहाटेपासूनच मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. दर्शनसाठी लांबच लाबं रांगा लागल्याचे चित्र आहे.
advertisement
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचा दिवस मानला जातो. सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीच्या कामनांसाठी भाविकांनी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. अनेक भक्तांनी कुटुंबासह मंदिरात येऊन दर्शन घेतले आणि आपल्या मनोकामनांची पूर्ती होण्यासाठी बाप्पाला साकडे घातले. तर काही्ंनी हिंदू नववर्षानिमित्त बाप्पांना अभिषेक केला.
advertisement
दरम्यान, गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण आहे. गुढ्या उभारून, गोडधोड पदार्थांचा आनंद घेत आणि एकमेकांना शुभेच्छा देत नागरिकांनी हा सण साजरा केला. दगडूशेठ गणपतीसह पुण्यातील इतर मंदिरे आणि प्रमुख ठिकाणीही भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पुणे शहरातून नववर्षाच्या स्वागताला मिरवणुका आणि शोभायात्रांचे देखील आयोजन केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 30, 2025 3:15 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Gudi Padwa: नववर्षाच्या स्वागताला बाप्पांचं दर्शन, पाडव्याला दगडूशेठ गणपती मंदिरात अलोट गर्दी









