Vastu Tips: किचन बरोबर ठिकाणी पण सिंक? या बाजूला नसेल तर अडचणी वाढवू शकतो, वास्तु नियम
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: घराची रचना आधीच वास्तुशास्त्रानुसार असल्यास फायदा होतो. आज आपण किचन आणि सिंकविषयीच्या काही गोष्टी समजून घेणार आहोत, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे केवळ अन्न बनवण्याचे ठिकाण असतेच शिवाय ते घराच्या ऊर्जा आणि आरोग्याचे केंद्र आहे. किचनमधील..
मुंबई : कित्येक लोक बांधलेल्या घराची तोडफोड करून वास्तुशास्त्र नियमानुसार रचना करून घेतात. त्रास झाल्यानंतर केलेल्या गोष्टी खर्चिक आणि मनस्ताप देणाऱ्या असतात. घराची रचना आधीच वास्तुशास्त्रानुसार असल्यास फायदा होतो. आज आपण किचन आणि सिंकविषयीच्या काही गोष्टी समजून घेणार आहोत, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे केवळ अन्न बनवण्याचे ठिकाण असतेच शिवाय ते घराच्या ऊर्जा आणि आरोग्याचे केंद्र आहे. किचनमधील सिंकची दिशा आणि स्थान घराची आर्थिक स्थिती आणि मानसिक शांततेवर मोठा परिणाम करते.
किचन सिंकसाठी शुभ दिशा - किचन सिंक बसवण्यासाठी ईशान्य कोपरा (उत्तर-पूर्व दिशा) सर्वात उत्तम मानला जातो. या दिशेला जलतत्व मानले गेल्याने येथे सिंक असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि समृद्धी वाढते. भांडी घासताना व्यक्तीचे तोंड उत्तर दिशेला असेल अशा पद्धतीने सिंकची रचना करावी. यामुळे मानसिक शांती मिळते आणि घरात खुशहाली राहते.
advertisement
या दिशांना सिंक लावणे टाळा - नैऋत्य दिशा (दक्षिण-पश्चिम) सिंकसाठी अशुभ मानली जाते. या दिशेला सिंक असल्यास कुटुंबात विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो आणि घरामध्ये मतभेद वाढू शकतात. तसेच यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊन पैशांचे असंतुलन राहू शकते.
advertisement
अग्नी आणि जल तत्वातील अंतर - वास्तूमध्ये अग्नी (गॅस शेगडी) आणि जल (सिंक) हे एकमेकांचे विरोधी तत्व मानले जातात. जर गॅस शेगडी आणि सिंक अगदी जवळ असतील, तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबाच्या शांततेवर परिणाम होतो. त्यामुळे सिंक आणि शेगडीमध्ये थोडी अंतराची जागा असणे आवश्यक आहे.
सिंकच्या खाली कचऱ्याचा डबा ठेवू नका - किचन सिंकच्या खाली डस्टबिन ठेवणे वास्तूच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे नकारात्मक लहरींचे प्रमाण वाढते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. डस्टबिन नेहमी किचनच्या एखाद्या वेगळ्या आणि झाकलेल्या जागी ठेवावे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 4:50 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: किचन बरोबर ठिकाणी पण सिंक? या बाजूला नसेल तर अडचणी वाढवू शकतो, वास्तु नियम






