Vastu Tips: अशा गोष्टी घरात असल्यावर कशी राहणार शांती-समृद्धी; वास्तुशास्त्र पाळून पण उपयोग नाही
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार, घरात असलेल्या काही गोष्टी तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा खराब करू शकतात. या गोष्टी घरात असणं वास्तुदोषाचं कारणही बनू शकतं. तसेच, या गोष्टी घरातील लोकांच्या...
मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात असलेल्या काही गोष्टी तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा खराब करू शकतात. या गोष्टी घरात असणं वास्तुदोषाचं कारणही बनू शकतं. तसेच, या गोष्टी घरातील लोकांच्या प्रगती, मानसिक शांती आणि आरोग्यावरही वाईट परिणाम करतात. त्यामुळे अशा गोष्टी त्वरित घराबाहेर काढायला हव्या. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
छतावर ठेवलेला कचरा - काही लोकांना घराचा जुनं आणि तुटलेलं-फुटलेलं सामान घराच्या छतावर जमा करण्याची सवय असते. वास्तूनुसार, घराच्या छतावर (टेरेस) पडलेला कचरा मानसिक अशांतीचं कारण बनू शकतो. छतावर ठेवलेल्या निरुपयोगी गोष्टी सकारात्मक ऊर्जेचा मार्ग रोखू शकतात. यामुळे तुमच्या जीवनात अडचणी येऊ शकतात आणि घरातील लोकांना मानसिक आजार होऊ शकतात. म्हणून, तुम्ही घराच्या छतावरून लगेच कचरा आणि तुटलेल्या गोष्टी हटवायला हव्या.
advertisement
बंद पडलेले घड्याळ - तुमच्या घरात बंद पडलेले घड्याळ असेल, तर ते तुमच्या सामाजिक आणि करिअरशी संबंधित कामांमध्ये अडथळ्याचं कारण बनू शकतं. त्यामुळे घरात कधीही बंद पडलेली घड्याळं ठेवू नयेत. या घड्याळांमध्ये नवीन सेल टाकून त्यांना एकतर दुरुस्त करा किंवा त्यांना घराबाहेर काढा.
मृत नातेवाईकांचे वस्त्र - धार्मिक मान्यतेनुसार, मृत नातेवाईकांचे कपडे देखील घरात वास्तुदोषाचं कारण बनू शकतात. घरात पडलेले मृत नातेवाईकांचे कपडे मृत आत्म्यांच्या मुक्तीच्या मार्गात अडथळा निर्माण करतात, यामुळं तुमच्या जीवनातही उतार-चढाव येऊ शकतात. म्हणून, मृत नातेवाईकांचे कपडे एकतर कोणालातरी दान द्या किंवा अन्य कोणत्याही पद्धतीने घराबाहेर काढा.
advertisement
गंजलेल्या लोखंडी वस्तू - घरात चुकूनही कधीही गंजलेल्या लोखंडी वस्तू ठेवू नयेत. गंजलेले लोखंड दारिद्र्याचे प्रतीक मानलं जातं आणि यामुळे शनिदेवाची कृपा देखील थांबते. गंजलेल्या लोखंडामुळे तुमची बनत असलेली कामेही बिघडू शकतात आणि प्रत्येक कामात तुम्हाला अयशस्वी व्हावे लागू शकतं. त्यामुळे गंजलेले लोखंड किंवा लोखंडाच्या वस्तू त्वरित घरातून बाहेर काढायला हव्या.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 7:30 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: अशा गोष्टी घरात असल्यावर कशी राहणार शांती-समृद्धी; वास्तुशास्त्र पाळून पण उपयोग नाही


