कोजागिरी पौर्णिमेला रात्री दूध का पितात? काय आहेत फायदे?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
वर्धा, 27 ऑक्टोबर : कोजागिरी पौर्णिमा हा सण भारतभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदा ही पौर्णिमा 28 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आटवून त्याचे नैवेद्य देवाला दाखवून आपण ग्रहण करत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. आपण कोजागिरी का साजरी करतो? त्यामागे काय आख्यायिका सांगितली जाते? कोजागिरीला रात्री दूध का आटवतात? यामागचं कारण काय याबद्दलच वर्ध्यातील पंडित हेमंतशास्त्री पाचखेडे यांनी माहिती दिली आहे.
कोजागिरीला लक्ष्मी येते धरतीवर?
श्रीमद् भागवतात असं सांगितलं आहे की अश्विन शुद्ध पौर्णिमेला लक्ष्मीचे प्रगटीकरण होते हे प्रगटीकरण भक्तांच्या आरोग्याचे दृष्टीकरणातून झालं. हा जो काळ आहे हा काळ ऋतू बदलण्याचा काळ आहे. या काळात विशेष जिवाणू विषाणू प्रकृती वरती आक्रमण करतात. याचे आक्रमण होऊ नये याकरिता कोजागिरीला रात्री चूल पेटवून दूध आटवून त्याचा प्रसाद लक्ष्मी आणि इंद्राला पहिले दिला जातो. त्यानंतर तो आपण सेवन करायचा असतो. हे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आहे,असं हेमंतशास्त्री पाचखेडे सांगतात.
advertisement
आरोग्याच्या तक्रारी होतात दूर
चंद्राच्या प्रकाशातलं आटवलेलं दूध प्यायल्याने त्याने आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि आरोग्य बाबतीतल्या तक्रारी दूर होतात. श्रीमद्भागवतेत असं वर्णन आहे की आजच्या दिवशी म्हणजेच कोजागिरीच्या दिवशी समुद्रमंथनातून लक्ष्मी प्रकट झाली समुद्रमंथनातून लक्ष्मी यासाठी प्रकट झाली की पृथ्वीवरचे लोक निरोगी आणि स्वस्थ रहावे या दृष्टिकोनातून झाली. वातावरण बदलत असल्यामुळे या काळात अनेक जीवाणू विषाणू पृथ्वीवरील नागरिकांना नुकसानकारक ठरू शकतात. त्यामुळे या संसर्गापासून या जिवाणू पासून आपले रक्षण व्हावं आपण सुरक्षित राहावं यासाठी देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते असे म्हटले जाते, अशी माहिती पंडित हेमंत शास्त्री पाचखेडे यांनी दिली.
advertisement
विदर्भात अशी होते कोजागिरी साजरी
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भुलाबाईच्या मूर्ती मांडून त्याची पूजा करून भूलाबाइचे गाणे गायले जातात. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालतो भुलाबाईची गाणी गायल्यानंतर खिरापतीचे वाटप होतं. त्यानंतर दूध आटवून रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवलं जातं हा नैवेद्य देवाला लक्ष्मीला दाखवून घरात सर्वाना प्रसाद म्हणून दिला जातो,अशाप्रकारे कोजागिरीचा उत्सव असतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
Oct 27, 2023 8:41 AM IST







