सत्यगणपती दर्शनाला अनवाणी पायांनी का जातात? इथं एका फांदीवर दिसतो चमत्कार
- Reported by:Nagesh Khanapure
- local18
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
Ganeshotsav Special : हा नवसाला पावणारा गणपती आहे. पिंपळाच्या झाडाखाली ही मूर्ती प्रकट झाली. 30-35 वर्षांपूर्वी या मूर्तीची मंदिरात स्थापना करण्यात आली, असं पुजारी सांगतात.
नागेश खानापुरे, प्रतिनिधी
नांदेड : भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून नांदेडच्या सत्यगणपतीची राज्यभरात ख्याती आहे. महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यांमधील भाविक मोठ्या संख्येनं इथं दर्शनासाठी येतात. अर्धापूर तालुक्यातील दाभडमध्ये असलेल्या सत्यगणपती मंदिर देवस्थानची वेगळीच कथा आहे.
मंदिराचे पुजारी मंथन महाराज सांगतात की, हा नवसाला पावणारा गणपती आहे. पिंपळाच्या झाडाखाली ही मूर्ती प्रकट झाली. 30-35 वर्षांपूर्वी या मूर्तीची मंदिरात स्थापना करण्यात आली.
advertisement
अनेक वर्षांपूर्वी गावाजवळच्या एका पिंपळाच्या झाडाखाली गणपतीची एक दगडाची स्वयंभू मूर्ती आढळली. पिंपळाखालच्या या गणपतीची गावकरी पूजा करत असत. हळूहळू सत्यगणपतीची ख्याती पंचक्रोशीत पसरली. पिंपळाच्या झाडाखालील स्वयंभू मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत गेली.
पुजारी नागोराव महाराज यांनी सांगितलं की, इथल्या पिंपळाच्या झाडाला पिंपळ आणि वडाची पानं येतात. तर मधूनच कडूलिंबाचा फाटा दिसतो. हा जणू चमत्कार मानला जातो. तसंच 3 झाडांमध्ये वसलेल्या सत्यगणपतीला साक्षात विष्णूचं रूप मानलं जातं. गणेश चतुर्थीला इथं हजारोंच्या संख्येनं भाविक अनवाणी पायांनी दर्शनाला येतात.
view commentsLocation :
Nanded,Maharashtra
First Published :
Sep 07, 2024 5:33 PM IST








