माघ महिन्याला 'माधव महिना' का म्हटले जाते? 99 टक्के लोकांना माहिती नाही, कोणाशी आहे खास संबंध!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू पंचांगानुसार अकरावा महिना असलेला 'माघ महिना' नुकताच सुरू झाला आहे. या महिन्याला केवळ 'माघ' न म्हणता धार्मिक ग्रंथ आणि पुराणांमध्ये 'माधव' महिना असेही संबोधले जाते.
Magh Month : हिंदू पंचांगानुसार अकरावा महिना असलेला 'माघ महिना' नुकताच सुरू झाला आहे. या महिन्याला केवळ 'माघ' न म्हणता धार्मिक ग्रंथ आणि पुराणांमध्ये 'माधव' महिना असेही संबोधले जाते. उज्जैनच्या आचार्यांच्या मते, हा महिना भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो. या एका महिन्यात केलेल्या स्नानाचे आणि दानाचे फळ हे हजारो अश्वमेध यज्ञांच्या फळापेक्षाही अधिक असते, असे शास्त्रात नमूद केले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की, माघ महिन्याला 'माधव' का म्हणतात आणि या महिन्याचे नेमके महत्त्व काय आहे.
माघ महिन्याला 'माधव' महिना का म्हणतात?
भगवान विष्णूंचे सान्निध्य
'माधव' हे भगवान विष्णूंचे एक प्रमुख नाव आहे. पद्मपुराणानुसार, माघ महिना हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या संपूर्ण महिन्यात विष्णूंची पूजा 'माधव' या नावानेच केली जाते. या महिन्यात भक्ती करणाऱ्या भक्तावर श्रीहरींची विशेष कृपा राहते, म्हणून याला 'माधव महिना' म्हटले जाते.
advertisement
व्युत्पत्ती आणि अर्थ
संस्कृतमध्ये 'मा' म्हणजे लक्ष्मी आणि 'धव्' म्हणजे पती किंवा स्वामी. म्हणजेच लक्ष्मीचा स्वामी ज्या महिन्यात सर्वाधिक प्रसन्न असतो, तो काळ म्हणजे माघ किंवा माधव मास. या महिन्याला विशेष महत्व असते. या महिन्यात माघी गणपती आणि अनेक उत्सव साजरे केले जातात.
नक्षत्राचा आधार
खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर, या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र 'मघा' नक्षत्राच्या सान्निध्यात असतो, म्हणून याला 'माघ' असे नाव पडले आहे. मात्र, आध्यात्मिक स्तरावर माधवाच्या भक्तीमुळे याला माधव महिना ही ओळख मिळाली.
advertisement
माघ महिन्याचे महत्त्व आणि पौराणिक संदर्भ
इंद्रदेवाला मिळालेले प्रायश्चित्त
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, जेव्हा गौतम ऋषींनी इंद्रदेवाला शाप दिला होता, तेव्हा इंद्रदेवाने माघ महिन्यात गंगेत स्नान करून प्रायश्चित्त घेतले होते. या स्नानामुळेच इंद्रदेव शापमुक्त झाले. तेव्हापासून या महिन्यात गंगास्नानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
कल्पवासाचे पुण्य
प्रयागराजमध्ये माघ महिन्यात 'कल्पवास' केला जातो. मत्स्य पुराणात उल्लेख आहे की, माघ महिन्यात सर्व तीर्थे आणि देवता प्रयागमध्ये वास्तव्यास असतात. या काळात संगम तटावर राहून केलेली साधना ही मोक्ष देणारी ठरते.
advertisement
'माधवः प्रीयताम्' मंत्राचे महत्त्व
या महिन्यात दान करताना 'माधवः प्रीयताम्' असा उच्चार केला जातो. असे मानले जाते की, या भावनेने केलेले दान थेट परमेश्वरापर्यंत पोहोचते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 6:40 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
माघ महिन्याला 'माधव महिना' का म्हटले जाते? 99 टक्के लोकांना माहिती नाही, कोणाशी आहे खास संबंध!








