Ajit Agarkar : एअरपोर्टबाहेर टीम इंडियाचे फॅन्स आगरकरला भिडले? चीफ सिलेक्टरने काढला पळ? Video तुफान व्हायरल!

Last Updated:

Ajit Agarkar Viral Video : अजित आगरकर विमानतळाबाहेर पडत असताना त्यांना चाहत्यांच्या एका अनपेक्षित प्रश्नाचा सामना करावा लागल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Ajit Agarkar Viral Video Rohit Sharma Virat Kohli fans slams
Ajit Agarkar Viral Video Rohit Sharma Virat Kohli fans slams
Indian fans slams Ajit Agarkar : आपल्यावर झालेल्या टीकेला शब्दांनी नाही तर बॅटने उत्तर द्यायचं असतं, असा क्रिकेटमधला अलिखित नियम आहे. टीम इंडियाच्या दोन्ही दिग्गजांनी देखील हेच केलं. रोहित आणि विराट यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात विजय खेचून आणला. अशातच आता रोहित आणि विराटच्या कामगिरीनंतर टीम इंडियाच्या चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय. अशातच आता अजित आगरकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

विमानतळाबाहेर पडत असताना....

टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते (Chief Selector) अजित आगरकर विमानतळाबाहेर पडत असताना त्यांना चाहत्यांच्या एका अनपेक्षित प्रश्नाचा सामना करावा लागल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. चाहत्याच्या या प्रश्नावर आगरकरने त्वरित कोणतंही उत्तर दिलं नाही, उलट तो काहीसा गडबडलेला दिसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement

2027 वर्ल्ड कप खेळण्यापासून कसं थांबवणार?

क्रिकेट फॅनने (Cricket Fan) थेट विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारून आगरकरला अडचणीत आणलं. या दोन वरिष्ठ खेळाडूंनी अलीकडे चांगलं स्कोर केले आहेत, त्यामुळे त्यांना 2027 वर्ल्ड कप खेळण्यापासून कसं थांबवणार, असा थेट प्रश्न चाहत्याने आगरकरला विचारला.
advertisement

आगरकर तुम्ही पळत का आहात?

"आगरकर तुम्ही पळत का आहात? RO-KO (रोहित-विराट) ने तुम्हाला घाबरवलंय का?" फॅनने विचारलेला हा प्रश्न आणि त्यावरील आगरकरची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर या घटनेची बरीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या व्हिडीओवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
advertisement

व्हिडीओ खरा की खोटा?

दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडिओ अजित आगरकरचा जुना व्हिडिओ दिसतो, कारण त्याने घातलेल्या केशरी जर्सीवर DREAM11 लिहिलेले आहे. हा व्हिडिओ त्या काळातील आहे का? जेव्हा ड्रीम11 टीम इंडियाचा जर्सी प्रायोजक होता, परंतु तो पुन्हा ऑडिओ डब करून व्हायरल केला जात आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ajit Agarkar : एअरपोर्टबाहेर टीम इंडियाचे फॅन्स आगरकरला भिडले? चीफ सिलेक्टरने काढला पळ? Video तुफान व्हायरल!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement