Asia Cup : ICCने आधी तोंडावर पाडलं,आता पाकिस्तान भलतीच घाबरली, UAE विरूद्ध सामना खेळणार का?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तान संघाची पत्रकार परिषद होणार होती. पण पाकिस्तानने अचानक ही पत्रकार परिषद रद्द केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान युएई विरूद्ध सामना खेळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये उद्या 17 सप्टेंबरला पाकिस्तान आणि युएई या दोन संघात सामना रंगणार आहे. सुपर 4 क्वालिफिकेशनच्या हिशोबाने हा महत्वाचा सामना असणार आहे.या सामन्याआधी आज मंगळवारी संध्याकाळी पाकिस्तान संघाची पत्रकार परिषद होणार होती. पण पाकिस्तानने अचानक ही पत्रकार परिषद रद्द केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान युएई विरूद्ध सामना खेळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
खरं तर भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान झालेल्या हस्तांदोलन वादानंतर पाकिस्तानने धमकी दिली होती की जर मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्यात आले नाही तर ते या सामन्यावर बहिष्कार टाकतील. पण आयसीसीने पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्यास नकार दिला होता.त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली होती. त्यात आता युएई विरूद्ध सामन्यापुर्वी पाकिस्तानला पत्रकार परिषदेला सामोरे जावे लागणार होते. यावेळी स्पर्धेतून बाहेर पडण्याविषयी प्रश्न पडण्याच्या भीतीने पाकिस्तानने पत्रकार परिषदच रद्द केली आहे.
advertisement
पाकिस्तानची मागणी फेटाळली
पाकिस्तानच्या बहिष्काराच्या धमकीकडे दुर्लक्ष करून, आयसीसीने पीसीबीची मागणी नाकारली होती आणि रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्यास नकार दिला होता. पाकिस्तान आणि युएई यांच्यात खेळला जाणारा सामना पाकिस्तान आणि युएई दोघांसाठी करो किंवा मरोची परिस्थिती आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो सुपर-4 साठी पात्र ठरेल. टीम इंडियाने आधीच सुपर-4 साठी पात्रता मिळवली आहे.
advertisement
रविवारी भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान, टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. यानंतर, पीसीबीने आयसीसीला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की यासाठी मॅच रेफरी जबाबदार आहेत. पीसीबीने आरोप केला की रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा यांना भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करू नका असे सांगितले होते. रेफरींनी जाणूनबुजून भारताचे समर्थन केल्याचा आरोपही करण्यात आला. तथापि, आयसीसीने त्यांच्या चौकशीत अँडी पायक्रॉफ्टला दोषी ठरवले नाही आणि पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 7:15 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : ICCने आधी तोंडावर पाडलं,आता पाकिस्तान भलतीच घाबरली, UAE विरूद्ध सामना खेळणार का?