शिवराजने असल्या पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या; महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील राड्यावर चंद्रहार पाटलांचे धक्कादायक वक्तव्य

Last Updated:

Maharahstra Kesari Controversy: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे दरम्यान झालेल्या राड्यावर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी एक धक्कादाक आणि वादग्रस्त वक्तव्य केले आहे. चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांना शिवराज राक्षेने गोळ्या घातल्या पाहिजे होत्या असे चंद्रहार पाटलांनी म्हटले आहे.

News18
News18
अहिल्यानगर: काल रविवारी २ फेब्रुवारी रोजी दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघ आणि अहिल्यानगर कुस्तीगिर संघाच्या सुंयक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या ६७ वी अजिंक्य कुस्ती स्पर्धेत झालेल्या राड्यावर आतापर्यंतची सर्वात टोकाची आणि वादग्रस्त अशी प्रतिक्रिया समोर आली आहे.पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यातील लढतीत मोहोळच्या एका डावात राक्षे पाठीवर आला अन् पंचांनी राक्षेला बाद घोषित केलं. राक्षेची पाठ टेकली नसताना त्याला पराभूत घोषीत केल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर धरली आणि त्यानंतर त्यांना लाथ मारली.या संपूर्ण प्रकरणावर काल संयमी प्रतिक्रिया देणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आता एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.
शिवराजने पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या, असे धक्कादायक वक्तव्य डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केले आहे. २००९ साली मी देखील अशाच वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो, असे देखील ते म्हणाले. या संपूर्ण प्रकणात पृथ्वीराजची चूक नाही, तर पंचांचा निर्णय चुकीचा आहे, असे ते म्हणाले.
advertisement
खर तर काल जो प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता. म्हणून सर्व माध्यमांच्या मार्फत सांगितले की, शिवराजने जो काही प्रकार केला तो चुकीचा केला. पण मी जेव्हा चुकी प्रकार म्हटले, तेव्हा मला असं म्हणायचे होते की पंचाला शिक्षा मिळत असताना थोडी शिक्षा मिळाली. शिवराजवर जो अन्याय झाला. त्यासाठी त्याने असल्या पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या, असे माझे स्पष्ट मत आहे. कारण हाच प्रकार २००९ साली माझ्यासोबत झाला होता. शिवराज आता तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता. तेव्हा मी पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होतो. पण पंचांच्या निर्णयामुळे सहा मिनिटांची कुस्ती दीड तास चालवल्यामुळे मी जो अन्याय सहन केला, तोच अन्याय शिवराज सहन करतोय.
advertisement
काल काय म्हणाले होते?
काल रविवारी ही घटना घडली तेव्हा चंद्रहार पाटील यांनी संयमी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत  असा प्रकार कधीच झाला नाही. मात्र तो का झाला याचा देखील विचार केला पाहिजे. पंचांना निकाल देण्याची घाई करण्याची गरज नव्हती. राक्षेला आक्षेप नोंदवण्याची संधी दिली गेली नाही . गोष्टी क्लिअर करून निकाल दिला पाहिजे होता. व्हिडिओ पाहून दोन्ही खेळाडूंना गोष्टी समजावून मग निकाल दिला पाहिजे होता, असे चंद्रहार पाटील म्हणाले होते.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
शिवराजने असल्या पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या; महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील राड्यावर चंद्रहार पाटलांचे धक्कादायक वक्तव्य
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement