दिल्ली कॅपिटल्सने 8.4 कोटींमध्ये खरेदी केलेल्या प्लेयरची मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी! काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अबदुल्ला यांनी आकिब नबी याची माफी मागितली आहे.
दिल्ली कॅपिटल्सने ८.४ कोटींची मोठी बोली लावलेला आकिब नबी (Auqib Nabi) सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. काश्मीरमधील मर्यादित सोयीसुविधा, कडाक्याची थंडी आणि मैदानांचा अभाव यावर मात करत त्याने स्वतःला सिद्ध केलंय. अशातच आता त्याला आयपीएल ऑक्शनमध्ये बोली लागली असून तो आता दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळताना दिसेल. अशातच आता जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अबदुल्ला यांनी आकिब नबी याची माफी मागितली आहे.
काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
आकिब नबी दारचे या अप्रतिम कामगिरीबद्दल अभिनंदन. आम्हाला सर्वांना त्याचा खूप अभिमान आहे आणि त्याचे कष्ट फळाला आले याचा मला आनंद आहे. आता आम्ही हंगाम सुरू होण्याची वाट पाहत आहोत, जेणेकरून आम्ही औकिबच्या यशाचा जल्लोष करू शकू. माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास, मी आता दिल्ली कॅपिटल्सचा समर्थक झालो आहे आणि मैदानाबाहेरून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी उत्सुक आहे, असं उमर अबदुल्ला म्हणाले. त्यावेळी उमर यांनी आकिबला टॅग केलं नाही. त्यावर आकिब रिप्लाय करत थँक्यू म्हटलं. पण त्यानंतर...
advertisement
Thank you for replying. I’m sorry I didn’t tag you, I couldn’t find your X handle. Best of luck for the coming season. I’m looking forward to watching all your matches. https://t.co/puTRVMttFi
— Omar Abdullah (@OmarAbdullah) December 16, 2025
advertisement
आकिबचं रिप्लाय आल्यावर मुख्यमंत्र्यांनी आकिब याची माफी मागितली. रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला टॅग केलं नाही त्याबद्दल माफ करा, मला तुमचे ट्विटर हँडल सापडलं नाही. आगामी हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचे सर्व सामने पाहण्यासाठी मी उत्सुक आहे, असं उमर अब्दुल्ला यांनी म्हटलं. त्यानंतर या ट्विटची जोरदार चर्चा झालीय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 1:35 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
दिल्ली कॅपिटल्सने 8.4 कोटींमध्ये खरेदी केलेल्या प्लेयरची मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी! काय घडलं?









