ऋषभ पंतला कॉपी करायला गेला; पण पोपट झाला, इंग्लंडचा स्टार कोलांटी उडी मारून फसला, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडिया इंग्लंडच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतात परतली आहे, पण भारतीय खेळाडूंबद्दलची इंग्लंडची क्रेझ अजूनही कायम आहे.
मुंबई : टीम इंडिया इंग्लंडच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतात परतली आहे, पण भारतीय खेळाडूंबद्दलची इंग्लंडची क्रेझ अजूनही कायम आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळलेल्या टीम इंडियाने इंग्लंडमध्ये 5 टेस्ट मॅचची सीरिज 2-2 ने ड्रॉ केली. ओव्हलमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा 6 रननी रोमाचंक विजय झाला. भारताविरुद्धच्या या सीरिजनंतर आता इंग्लंडचे खेळाडू द हंड्रेड स्पर्धेत खेळत आहेत. याच स्पर्धेत इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू हॅरी ब्रुक याने ऋषभ पंत याच्यासारखी कोलांटी उडी मारण्याचा प्रयत्न केला.
अंडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये शतक केल्यानंतर सेलिब्रेशन करताना ऋषभ पंतने कोलांटी उडी मारून सेलिब्रेशन केलं होतं. हॅरी ब्रुकनेही ऋषभ पंतलाच कॉपी करण्याचा प्रयत्न केला, पण यात त्याला यश आलं नाही. द हंड्रेड ही स्पर्धा प्रसारित करणाऱ्या स्काय स्पोर्ट्सने हॅरी ब्रुकच्या कोलांटी उडीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
'They might've had a bet' 😅
Harry Brook impresses Zak Crawley with a warm-up cartwheel 🤸 pic.twitter.com/sc4HeZE7mP
— Sky Sports Cricket (@SkyCricket) August 7, 2025
advertisement
ब्रुकला मिळालं मॅन ऑफ द सीरिज
अंडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये हॅरी ब्रुक सगळ्या 5 टेस्ट खेळल्या. यातल्या 9 इनिंगमध्ये त्याने 481 रन केले, ज्यात दोन शतकं (158 आणि 111) आणि दोन अर्धशतकं (99, 53) चा समावेश आहे. हेडिंग्ले टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ब्रुकने 99 रननी सुरूवात केली, पण तो दुसऱ्या इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झाला. यानंतर बर्मिंघममधल्या दुसऱ्या टेस्टमध्ये त्याने 158 रन केले आणि जेमी स्मिथ (184 नाबाद) सोबत 303 रनची पार्टनरशीप केली, पण तरीही इंग्लंडचा 336 रननी पराभव झाला.
advertisement
ब्रुकने पुढच्या दोन टेस्टमध्ये 11, 23 आणि 3 रनचा स्कोअर केला. यानंतर शेवटच्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये ब्रुकने चांगली बॅटिंग करून सीरिजचा शेवट केला. सीरिजमधल्या या कामगिरीबद्दल ब्रुकला इंग्लंडचा प्लेअर ऑफ द सीरिज म्हणून गौरवण्यात आलं, तर भारताकडून हा पुरस्कार शुभमन गिलला मिळाला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 11, 2025 6:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ऋषभ पंतला कॉपी करायला गेला; पण पोपट झाला, इंग्लंडचा स्टार कोलांटी उडी मारून फसला, Video


