Cricket Rules : ना कॅच घेतला ना रनआऊट, LBW पण नाही! विचित्र पद्धतीने आऊट झाला भारतीय खेळाडू, पाहा कसं?

Last Updated:

Hit the ball twice Out : मणिपूरचा फलंदाज लामाबम सिंह हा आर्यन बोराच्या एका बॉलवर विचित्र पद्धतीने बाद झाला आणि तो 'हिट द बॉल ट्वाइस' नियमाचा बळी ठरला.

Hit the ball twice Out in Cricket
Hit the ball twice Out in Cricket
Hit the ball twice Out in Cricket : क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं असं म्हणतात. क्रिकेट खेळातील नियम देखील तितकेच इन्ट्रेस्टिंग असतात. कधीकधी मैदानात खेळाडू अशा पद्धतीने बाद होतात, ज्याला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात दुर्मीळ घटना म्हटले जाते. नुकतेच, रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) प्लेट लीग सामन्यात असाच एक आश्चर्यकारक क्षण पाहायला मिळाला. ज्यामुळे क्रिकेटच्या वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

हिट द बॉल ट्वाइस

सुरत येथे मणिपूर आणि मेघालय यांच्यात रणजी करंडक सामना सुरू होता. मणिपूरचा फलंदाज लामाबम सिंह हा आर्यन बोराच्या एका बॉलवर विचित्र पद्धतीने बाद झाला आणि तो 'हिट द बॉल ट्वाइस' (Hit the Ball Twice) नियमाचा बळी ठरला. आर्यन बोरा या खेळाडूला तब्बल 20 वर्षानंतर विचित्र पद्धतीने आऊट देण्यात आलं.
advertisement

नेमकं काय घडलं?

आर्यन बोराचा बॉल लामाबमने बॅटने डिफेंड (Defend) केला, पण बॉल अतिशय हळू वेगाने स्टंप्सच्या (Stumps) दिशेने सरकू लागला. लामाबमने आपले विकेट (Wicket) वाचवण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बॅट लावून बॉल अडवला. मैदानात उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, बॉल स्टंप्सकडे जात होता आणि फलंदाजाने विकेट वाचवण्यासाठी योग्य नियमाला धरून असलेला प्रयत्न केला होता. पण, अंपायरने त्वरित निर्णय दिला आणि त्याला बाद ठरवलं. रणजी ट्रॉफीमध्ये अशाप्रकारे बाद होण्याची ही केवळ पाचवी घटना आहे.
advertisement

बॅटर बॉल पॅडने थांबवू शकला असता...

सामना अधिकाऱ्याने सांगितलं की, बॅटर बॉल पॅडने थांबवू शकला असता, पण त्याने बॅट लावून बॉल अडवला, म्हणून अंपायर धर्मेश भारद्वाज यांनी तत्काळ 'हिट द बॉल ट्वाइस' (Hit the Ball Twice) नियमानुसार लामाबम यांना आऊट घोषित केलं आणि मेघालयने अपील करताच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतला. या निर्णयावर फलंदाजाने किंवा त्यांच्या संघाने कोणताही आक्षेप घेतला नाही.
advertisement

नियम काय सांगतो?

एमसीसीच्या (MCC) नियम 34.1.1 नुसार, जर बॉल खेळात असेल आणि स्ट्रायकरच्या बॅट किंवा शरीराला लागल्यानंतर त्याने जाणूनबुजून दुसऱ्यांदा बॅट किंवा शरीराने बॉलला मारला (ज्या हाताने बॅट पकडली नसेल तो वगळता) आणि हे फिल्डरने बॉलला स्पर्श करण्यापूर्वी घडलं, तर त्याला 'हिट द बॉल ट्वाइस' बाद दिलं जातं. फक्त विकेट वाचवण्यासाठी बॉलला दुसऱ्यांदा मारले असेल, तरच तो अपवाद असतो. मात्र या प्रकरणात अंपायरने मुद्दामहून मारल्याचा निर्णय दिला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Cricket Rules : ना कॅच घेतला ना रनआऊट, LBW पण नाही! विचित्र पद्धतीने आऊट झाला भारतीय खेळाडू, पाहा कसं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement