विराट-रोहित उद्याच रिटायरमेंट घेणार? गावसकरांनी फोडली टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधली बातमी!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी वनडे शनिवारी सिडनीमध्ये खेळवली जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची ऑस्ट्रेलियामधील ही शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच असणार आहे.
सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी वनडे शनिवारी सिडनीमध्ये खेळवली जाणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झाल्यामुळे टीम इंडियाने ही सीरिज आधीच गमावली आहे, त्यामुळे आता व्हाईट वॉश टाळण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची ऑस्ट्रेलियामधील ही शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच असणार आहे, कारण पुढच्या 2 वर्षात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाहीये.
विराट कोहली पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये शून्य रनवर आऊट झाला आहे. तर पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर रोहित शर्माने दुसऱ्या मॅचमध्ये अर्धशतकी खेळी केली. मागच्या काही काळापासून विराट कोहली आणि रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजनंतर निवृत्ती घेतील अशा चर्चा सुरू आहेत. ऍडलेड वनडेमध्ये आऊट झाल्यानंतर विराट कोहलीने प्रेक्षकांकडे पाहून हात उंचावून अभिवादन केलं, तेव्हापासून या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
advertisement
काय म्हणाले सुनिल गावसकर?
दरम्यान सुनिल गावसकर यांनी विराट आणि रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. 'विराटने जे काही केलं, त्याकडे तुम्ही फार वेगळ्या दृष्टीने पाहू नका. विराट खेळायला आला, तेव्हा त्याचं ज्या पद्धतीने स्वागत झालं, भारताचे प्रेक्षक तिकडे होतेच, पण ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षक जास्त होते. त्यांनी मनापासून विराटचं स्वागत केलं, त्याला विराटने आऊट झाल्यानंतर प्रतिसाद दिला. खेळाडू जेव्हा मैदानात येतात तेव्हा तिथे सदस्यांच्या बसण्याची जागा असते. हे सदस्य ऑस्ट्रेलियाकडून प्रथम श्रेणी आणि टेस्ट क्रिकेट खेळलेले खेळाडू असतात, त्यांना विराटने प्रतिसाद दिला. यात तुम्ही फार काही पाहू नका', असं गावसकर म्हणाले आहेत.
advertisement
'विराट पळून जाणारा खेळाडू नाही. झिरो-झिरोवर आऊट झाल्यानंतर तो निघून जाईल, असं तुम्हाला वाटतंय? अजिबात नाही. तो सर्वोच्च स्थानावर गेल्यानंतर जाईल. सिडनीनंतर दक्षिण आफ्रिका आहे, त्यानंतर बऱ्याच वनडे आहेत. रोहित आणि विराटसाठी 2027 चा वर्ल्ड कपही आहे', असा विश्वास गावसकरांनी व्यक्त केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 5:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
विराट-रोहित उद्याच रिटायरमेंट घेणार? गावसकरांनी फोडली टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधली बातमी!


