रोहित आऊट शुभमन गिल इन? कॅप्टन्सीवरुन अजित आगरकर यांच्या मनात नक्की काय?

Last Updated:

रोहित शर्मा वन डे कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह असून शुभमन गिलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कॅप्टन करण्याची शक्यता आहे. बीसीसीआय लवकरच निर्णय जाहीर करणार आहे.

Shubhman Gill Wicket
Shubhman Gill Wicket
रोहित शर्मावर वन डे क्रिकेटच्या कॅप्टन्सीची टांगती तलवार आहे. मात्र आता बीसीसीआयची जी टीम सिलेक्शनची मिटिंग सुरू आहे त्या मिटिंगमध्ये अशा काही घडामोडी घडल्या ज्यामुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा वन डेसाठी कॅप्टन नसेल अशी शंका आणि चर्चा जोर धरू लागली आहे. तर रोहित शर्मा आऊट आणि टीम इंडियाची वन डे साठीची जबाबदारी ही शुभमन गिलकडे दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत आता लवकरच निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.
टीम इंडिया सिलेक्शन कमिटीची बैठक सुरू आहे. टीम इंडियाच्या नेतृत्वाच्या स्तरावर मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या शुभमन गिलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन वन डे सामन्यांसाठी नवा कॅप्टन म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सध्याचा कॅप्टन रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली हे दोघेही या संघात खेळणार आहेत.
advertisement
सिलेक्टर्सच्या मनात काय?
सिलेक्टर्सनी हा निर्णय विचार करुनच घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपसाठी गिलला तयार करण्यासाठी त्याला संधी दिली जात आहे. गिलचं वन डेमधील कॅप्टन म्हणून कौशल्यही आजमावलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिलसाठी ही मोठी संधी असेल असं म्हणायला हरकत नाही. रोहित शर्माकडून गिलकडे वन डे क्रिकेटचे नेतृत्व देण्याबद्दलची ही संपूर्ण प्रक्रिया मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याही निदर्शनास आणून दिली आहे.
advertisement
गिलला संधी की त्याची परीक्षा
रोहित शर्माकडून गिलकडे ही धुरा सोपवल्यास, भारतीय क्रिकेटमधील हा नेतृत्वाचा मोठा बदल ठरणार आहे. रोहित आणि कोहली हे सध्या तरी एकदिवसीय क्रिकेटच्या योजनेत असले, तरी ते तब्बल आठ महिन्यांनंतर सामना खेळणार आहेत. दुबई इथे न्यूझीलंडविरुद्ध जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर ते इतक्या महिन्यांनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरतील. गिलने नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या त्याच्या पहिल्याच कसोटी कर्णधारपदाच्या मालिकेत ५ सामन्यांत ४ शतकांसह ७५४ धावा (सरासरी ७५.४०) केल्या होत्या. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली होती.
advertisement
एकदिवसीय क्रिकेटमध्येही गिलचा अनुभव मोठा आहे. रोहितने मे महिन्यातच कसोटी कर्णधारपद सोडल्यामुळे गिलची कसोटी कर्णधार म्हणून निवड झाली होती. आता वन डे क्रिकेटमध्येही नेतृत्व बदलत असताना, शुभमन गिल हाच भविष्यातील कर्णधार म्हणून तयार केला जातोय की आणखी कुणाला संधी दिली जाणार ते पाहावं लगणार आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रोहित आऊट शुभमन गिल इन? कॅप्टन्सीवरुन अजित आगरकर यांच्या मनात नक्की काय?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement