IND vs AUS : वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचं गल्ली क्रिकेट, कॅप्टनने मैदानात काय केलं? पाहून शॉक व्हाल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महिला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची कर्णधार आणि विकेट कीपर एलिसा हिली हिने दोन घोडचुका केल्या आहेत.
नवी मुंबई : महिला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची कर्णधार आणि विकेट कीपर एलिसा हिली हिने दोन घोडचुका केल्या आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यात हिलीने दोन महत्त्वाचे कॅच सोडले आहेत. हिलीने सुरूवातीलाच हरमनप्रीतला जीवनदान दिलं, यानंतर तिने 33 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला जेमिमा रॉड्रिग्जचा कॅच सोडला. हिलीने कॅच सोडला तेव्हा जेमिमा रॉड्रिग्ज 89 बॉलमध्ये 82 रनवर खेळत होती. हिलीने हरमनप्रीतचा सोडलेला कॅच ऑस्ट्रेलियाला महागात पडला, कारण हरमनप्रीतने 88 बॉलमध्ये 89 रन केले, ज्यात 10 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 339 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. वर्ल्ड कपची पहिलीच मॅच खेळणारी शफाली वर्मा 5 बॉलमध्ये 10 रन करून आऊट झाली. यानंतर स्मृती मंधानाने जेमिमाच्या साथीने ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर आक्रमण करायला सुरूवात केली, पण स्मृती मंधाना 24 रनवर आऊट झाली, स्मृतीच्या विकेटवरून बराच वादही निर्माण झाला.
1.4 Billion says - 'Thank you Alyssa Healy' pic.twitter.com/4T1l2RDU7q
— Richard Kettleborough (@RichKettle07) October 30, 2025
advertisement
ऑस्ट्रेलियाचा मोठा स्कोअर
पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा 49.5 ओव्हरमध्ये 338 रनवर ऑलआऊट झाला आहे. फोबे लिचफिल्डने 93 बॉलमध्ये 119 रनची खेळी केली, तर एलिस पेरीने 77 आणि ऍशलेघ गार्डनरने 63 रन केले, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
भारताकडून श्री चरिणी आणि दीप्ती शर्मा यांना 2-2 विकेट मिळाल्या. तर क्रांती गौड, अमनजोत कौर आणि राधा यादव यांना एक-एक विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात विजय मिळवणारी टीम फायनलला पोहोचेल. फायनलमध्ये विजेत्या टीमचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल.
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
October 30, 2025 10:11 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचं गल्ली क्रिकेट, कॅप्टनने मैदानात काय केलं? पाहून शॉक व्हाल!


