IND vs ENG 1st ODI : नागपूरकरांना तब्बल 6 वर्षानंतर LIVE मॅच पाहण्याची संधी, तिकीटाचा 'काळाबाजार', 400 चं तिकीट 9 हजाराला!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs ENG 1st ODI black tickets seized : नागपूर वनडेआधी जास्त दराने तिकीट विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर दोघांनाही रंगेहात अटक करण्यात आली.
IND vs ENG 1st ODI : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर तब्बल सहा वर्षानंतर आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्याच्या वनडे सामन्यातील पहिला सामना नागपूरमध्ये खेळवला जाईल. या एकदिवसीय सामन्याची तिकिटे ब्लॅकमध्ये विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. सिव्हिल लाईन येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानजवळून सदर पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई करण्यात आली. 62 वर्षीय मनोहर वंजानी आणि 38 वर्षीय राहुल वानखेडे असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे दोघंही विसीएचे कर्मचारी असल्याची बतावणी करून तिकिटांचा काळाबाजार करत होते.
दोघांना रंगेहात अटक
ऑनलाईन तिकीट खरेदी केलेल्यांना बारकोड दाखवून सिविल लाईन्सविषयी येथून तिकिटाची हार्ड कॉपी घ्यायची असते. त्यासाठी सोमवारपासूनच क्रिकेट प्रेमींच्या रांगा लागल्या आहेत. अशातच दोघंही आरोपी याच परिसरात जास्त दराने तिकीट विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर दोघांनाही रंगेहात अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणात अधिकची कारवाई करत आहेत.
advertisement
अवघ्या काही मिनिटातच तिकिटे विक्री
रविवारी सकाळी 10 वाजतापासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्याची ऑनलाईन तिकिट विक्रीला सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण तिकिटे विकली गेली. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने तिकीट घेण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. व्हीसीएने प्रत्येक व्यक्तीला तिकिटविक्रीसाठी दोन तिकिटांची मर्यादा घातली असल्याने मोठी गर्दी दिसून आली होती. यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच अनाथ मुलांसाठी व्हीसीएमार्फत तिकिट उपलब्ध करून देण्यात आले.
advertisement
6 फेब्रुवारी दुपारी दीड वाजल्यापासून...
दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड सामना 6 फेब्रुवारी दुपारी दीड वाजल्यापासून व्हीसीएच्या जामठा मैदानावर खेळविला जाईल. या मैदानाची क्षंमता सुमारे 44 हजार लोकांची आहे. या मैदानावर अंतिम सामना 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरोधात खेळविण्यात आला होता. त्यानंतर एकही वनडे सामना या स्टेडियमवर खेळवला गेला नव्हता.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
February 05, 2025 3:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG 1st ODI : नागपूरकरांना तब्बल 6 वर्षानंतर LIVE मॅच पाहण्याची संधी, तिकीटाचा 'काळाबाजार', 400 चं तिकीट 9 हजाराला!


