IND vs ENG : राहुलच इंग्लंडमध्ये खणखणीत शतक, इंग्लिश खेळाडूंना फोडला घाम, रोहितच्या जागेचं टेन्शन मिटलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
येत्या 20 जूनपासून भारत आणि इंग्लंड या दोन संघात पाच सामन्यांची टेस्ट मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेआधी भारत सध्या सराव सामन्यात व्यस्त आहे.या सराव सामन्यात आता के एल राहुलने शतक ठोकलं आहे.
India vs England, KL Rahul Century : येत्या 20 जूनपासून भारत आणि इंग्लंड या दोन संघात पाच सामन्यांची टेस्ट मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेआधी भारत सध्या सराव सामन्यात व्यस्त आहे.या सराव सामन्यात आता के एल राहुलने शतक ठोकलं आहे.या शतकासह आता राहुलने टीम इंडियात सलामीची जागा फिक्स केली आहे.
खरं तर भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात नॉर्थम्प्टन येथे दुसरा सराव सामना खेळवला जात आहे.या सामन्यता केएल राहुलची बॅट तळपली आहे. राहुलने 151 बॉलमध्ये शतक ठोकलं आहे. या खेळीत त्याने 13 खणखणीत चौकार आणि 1 षटकार लगावला आहे.या खेळीनंतर राहुलने टीम इंडियात सलामीचे स्थान पक्क केलं आहे.
🚨 19th FIRST CLASS HUNDRED MOMENT OF KL RAHUL 🚨
- The Backbone of Indian Team. pic.twitter.com/ybEsKGJ5qs
— Johns. (@CricCrazyJohns) June 6, 2025
advertisement
रोहित शर्माने टेस्टमधून निवृ्ती घेतल्यानंतर टीम इंडियातून आता टेस्टमध्ये यशस्वी जयस्वालसोबत सलामीला कोण उतरणार असा प्रश्न होता. पण आज केएल राहुलने शतक ठोकून सलामीचं स्थान पक्क केलं आहे.त्यामुळे आता टीम इंडियाकडुन आता इंग्लंडविरूद्ध यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल सलामी करताना दिसणार आहे.
दरम्यान या सराव सामन्यात राहुल व्यतिरीक्त ध्रुव ज्युरेलने 53 धावांची अर्धशतकीय खेळी केली आहे. बाकी शुबमन गिल, अभिमन्य ईश्वरन, करूण नायर आणि नितिश कुमार रेड्डी हे खेळाडू हे मोठ्या धावा न करताच बाद झाले आहेत.
advertisement
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बॅथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.
इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईसवरन, मोहम्मद जयस्वार, मोहम्मद जयस्वार, बृहस्पतिवार प्रसिध कृष्णा, करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
advertisement
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 20-24 जून 2025 हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी: 2-6 जुलै 2025 एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी: 10-14 जुलै 2025 लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी: 23-27 जुलै 2025 ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी: 31 जुलै 4 ऑगस्ट 2025 द ओव्हल, लंडन
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 06, 2025 9:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : राहुलच इंग्लंडमध्ये खणखणीत शतक, इंग्लिश खेळाडूंना फोडला घाम, रोहितच्या जागेचं टेन्शन मिटलं