IND vs ENG : संजय मांजरेकरांचा पुन्हा एकदा जडेजाशी पंगा, मॅच सुरू व्हायच्या आधीच काढली कळ!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला सुरूवात झाली आहे. दोन्ही टीममध्ये लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात पहिली टेस्ट मॅच खेळवली जात आहे. पण या सामन्याआधीच संजय मांजरेकर यांनी रवींद्र जडेजावर निशाणा साधला आहे.
लीड्स : टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला सुरूवात झाली आहे. दोन्ही टीममध्ये लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात पहिली टेस्ट मॅच खेळवली जात आहे, पण या सामन्याआधी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी इंग्लंडविरुद्धच्या रवींद्र जडेजाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जडेजाची इंग्लंडविरुद्धची कामगिरी चांगली नाही, त्यामुळे कर्णधार शुभमन गिलने जडेजाऐवजी दुसऱ्या स्पिन बॉलरचा विचार करावा, असा सल्ला मांजरेकर यांनी दिला होता, पण पहिल्या टेस्टमध्ये गिलने जडेजाला संधी दिली आहे.
जडेजाच्या कामगिरीवर मांजरेकरांचा निशाणा
रवींद्र जडेजाची अलीकडची कामगिरी पाहता टीम इंडियाच्या कर्णधाराने इतर पर्यायांवर लक्ष केंद्रीत करावं, असा सल्ला संजय मांजरेकर यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलताना दिला आहे. रवींद्र जडेजा नेहमीच संघर्ष करताना दिसतो, त्यामुळे गिलला स्पिन बॉलिंगमध्ये पर्याय शोधावे लागतील, असं मांजरेकर म्हणाले.
रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध 12 टेस्टमध्ये 29.18 च्या सरासरीने 642 रन केल्या आहेत, यामध्ये एका शतकाचा समावेश आहे, यासोबतच त्याने इंग्लंडविरुद्ध 27 विकेटही घेतल्या आहेत. मागच्या वर्षी इंग्लंडची टीम भारताच्या दौऱ्यावर होती तेव्हा जडेजाची कामगिरी निराशाजनक झाली होती. 8 इनिंगमध्ये त्याला फक्त 19 विकेट घेता आल्या. जडेजाची ही कामगिरी पाहता पहिल्या टेस्टमध्ये कुलदीपला संधी मिळावी, असं मत मांजरेकरांनी मांडलं होतं.
advertisement
SENA देशांविरुद्ध जडेजाची कामगिरी
टीम इंडियासाठी सातव्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या SENA देशांविरुद्ध म्हणजेच साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध जडेजाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. जडेजाची बॉलिंग सरासरी 24.24 आहे, पण या देशांमध्ये तीच सरासरी 38.46 पर्यंत पोहोचते. जून 2021 पासून या देशांमध्ये जडेजाची सरासरी आणखी खराब म्हणजे 47.60 झाली आहे, या काळात त्याने 11 मॅच खेळून फक्त 15 विकेट घेतल्या आहेत.
advertisement
याशिवाय, 2024-25 मध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये जडेजाने 5 इनिंगमध्ये 135 रन केल्या, तसंच त्याला बॉलिंगमध्ये फक्त 4 विकेट मिळाल्या. ही कामगिरी पाहून संजय मांजरेकर यांनी रवींद्र जडेजावर निशाणा साधला आहे. 2019 च्या सुरुवातीलाही मांजरेकर यांनी जडेजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते.
2019 मध्ये जडेजा-मांजरेकर वाद
2019 साली झालेल्या वनडे वर्ल्ड कपवेळीही जडेजा आणि मांजरेकर यांच्यात वाद झाले होते. संजय मांजरेकर यांनी रवींद्र जडेजाचा उल्लेख 'बिट्स ऍण्ड पीस क्रिकेटर' असा केला होता, यानंतर बराच गदारोळ झाला होता. जडेजानेही मांजरेकर यांना सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिलं होतं. 'मी अजूनही तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलो आहे. ज्यांनी काहीतरी साध्य केलं आहे, त्यांचा आदर करायला शिका', असा पलटवार जडेजाने केला होता.
advertisement
2019 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये जडेजाने न्यूझीलंडविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली, यानंतर मांजरेकर यांनी माफीही मागितली. या वादामुळे स्टार स्पोर्ट्सने संजय मांजरेकर यांना त्यांच्या कॉमेंट्री टीममधून बाहेर काढलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 20, 2025 7:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : संजय मांजरेकरांचा पुन्हा एकदा जडेजाशी पंगा, मॅच सुरू व्हायच्या आधीच काढली कळ!