IND vs NZ Indore ODI : शुभमनने मागवली 3 लाखांची मशीन, विराटने बॅगेत लपवून आणली लाखमोलाची वस्तू, टीम इंडिया अलर्ट मोडवर! प्रकरण काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs NZ ODI Indore water contamination : टीम इंडिया इंदूरमध्ये दाखल झाली. सामन्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल सुमारे 3 लाख रुपयांचं मशीन घेऊन आला होता. अशातच विराटचा व्हिडीओ समोर आलाय.
India vs New Zealand 3rd ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडिया इंदूरमध्ये दाखल झाली. तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच सामन्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल सुमारे 3 लाख रुपयांचं मशीन घेऊन आला होता, जे त्याने त्याच्या हॉटेलच्या खोलीत ठेवलं आहे. पण हे तीन लाखाचं मशीन कशासाठी? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. त्याचं कारण इंदौरमध्ये झालेला 24 लोकांचा मृत्यू...
तब्बल 24 लोकांचा मृत्यू
इंदौरमध्ये दूषित पाणी पिऊन एक दोन नव्हे तर तब्बल 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील भागीरथपुरा परिसर दूषित पिण्याच्या पाण्यामुळे उलट्या आणि अतिसाराच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांच्या मृत्यूमुळे चर्चेत आहे. अशातच आता टीम इंडिया देखील इंदौरमध्ये असल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंनी अधिकची काळजी घेणं पसंत केलं. अशातच आता विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
advertisement
पाहा Video
pure bag mai sirf paani ki bottles hai pic.twitter.com/SwzvGAWBo0
— Nush (@kyayaarcheeks) January 17, 2026
विराट पाणी स्वत: घेऊन आला
विराट कोहली आता इंदौरमध्ये पोहोचला असून विराटने आपलं पाणी स्वत: घेऊन आला आहे. विराट कोहली हॉटेलमध्ये आपल्या पाण्याच्या बाटल्या घेऊन स्वत: पोहोचला. त्याच्या हातात एक बॅग दिसत आहे. ज्याच फक्त पाण्याच्या बाटल्या दिसत आहे. विराट कोहली फक्त एवियन (Evian) नेचुरल स्प्रिंग वॉटर पितो, ज्याची किंमत चार हजार रुपये लिटर आहे.
advertisement
विराट कोहलीचा डाएट
दरम्यान, इंदौरमध्ये पिण्याच्या पाण्यासह टीम इंडिया खेळाडूंच्या आहाराकडंही विशेष लक्ष देतीये. विराट कोहलीच्या आहारात ग्रील्ड हिरव्या भाज्या, दक्षिण भारतीय पदार्थ आणि सूपचा समावेश आहे. शुभमन गिलच्या आहारात उकडलेले अंडे, हिरव्या भाज्या, मसूर, रायता आणि सूपचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्माच्या आहारात मसूर, भात, सॅलड, सूप, चीज, भाज्या, दही आणि फळे यांचा समावेश आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
Jan 18, 2026 9:15 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ Indore ODI : शुभमनने मागवली 3 लाखांची मशीन, विराटने बॅगेत लपवून आणली लाखमोलाची वस्तू, टीम इंडिया अलर्ट मोडवर! प्रकरण काय?










