IND vs PAK : भारताचा डाव गडगडला, वैभव सुर्यवंशी-कॅप्टन म्हात्रे माघारी, Asia Cup जिंकण्याच स्वप्न भंगणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दुबईच्या आयसीसीच्या अॅकडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या अंडर 19 आशिया कपच्या फायनल सामन्यात पाकिस्तानने 347 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या 4 ओव्हरमध्ये 3 विकेट पडल्या आहेत.
India vs Pakistan, Under 19 Asia Cup 2025 : दुबईच्या आयसीसीच्या अॅकडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या अंडर 19 आशिया कपच्या फायनल सामन्यात पाकिस्तानने 347 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या 4 ओव्हरमध्ये 3 विकेट पडल्या आहेत. आणि विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशी आणि आयुष्य म्हात्रे दोघेही माघारी परतले आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या हातातून आशिया कप निसटण्याची शक्यता आहे.
advertisement
खरं तर पाकिस्तानने दिलेल्या 347 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी चांगली सुरूवात केली होती. यावेळी वैभव आणि आयुष म्हात्रेने पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा कुटल्या होत्या. त्यानंतर अली राजाच्या तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर आयुष म्हात्रे कॅच आऊट होऊन 2 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर आरोन जॉर्ज मैदानात आला. पण तो देखील 16 धावांवर बाद झाला.त्यानंतर वैभव मोठी खेळेल अशी अपेक्षा होती. पण तो 26 धावा करून बाद झाला होता.त्यामुळे भारताच्या 49 धावात 3 विकेट पडल्या होत्या.
advertisement
आता इतर खेळाडू मैदानात बॅटींग करतायत पण टीम इंडियाची फायनल जिंकण्याची शक्यता खुपच कमी वाटते.त्यामुळे आता पुढे काय होते हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली होती. पाकिस्तानकडून हमजा जहूर आणि समीर मिन्हास सलामीला उतरले होते. या दोघांनी 3 ओव्हरमध्ये 31 धावा काढल्या होत्या. त्यानंतर समीरने उस्मान खानसह पाकिस्तानचा डाव सारवला होता. हा डाव सावरताना पाकिस्तानचे एकामागून एक विकेट पडत होते. पण समीर मिन्हास एकटा भारताच्या गोलंदाजांना भिडत होता.
advertisement
समीर मिन्हासने एकट्याने 113 बॉलमध्ये 172 धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीत त्याने 9 षटकार आणि 17 चौकार मारले आहेत. मिन्हास सोबत अहमद हुसेनने 56 धावांची खेळी केली. हे दोन्ही खेळाडू मैदानात पाकिस्तान 400 पार धावा करेल की काय?असे वाटत होते. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत शेवटच्या क्षणी 15 बॉलमध्ये 4 विकेट काढले होते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 3:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : भारताचा डाव गडगडला, वैभव सुर्यवंशी-कॅप्टन म्हात्रे माघारी, Asia Cup जिंकण्याच स्वप्न भंगणार?











