IND vs PAK : कुणीच तयार नव्हतं पण गंभीरच म्हणाला 'हँडशेक करून या...', कॅमेऱ्यात दिसला हेड कोचचा खरा मनसुबा! पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs Pakistan, Asia Cup 2025 : भारतीय खेळाडूंनी मॅच संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन (Handshake) करण्यास नकार दिला. या प्रकारामुळे एक मोठा वाद निर्माण झाला होता.
Gautam Gambhir Changes Handshake Protocol Plan : आशिया चषकात भारतीय क्रिकेट टीमने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. सुपर-4 मॅचमध्ये भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. युवा सलामीवीर अभिषेक शर्माच्या धमाकेदार बॅटिंगमुळे भारताने 7 बॉल राखून आणि 172 रन्सचं लक्ष्य सहज पार केलं. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावत 171 रन्सचा स्कोर उभा केला होता. पण त्यांच्या बॉलर्सना चांगली कामगिरी करता आली नाही. अशातच या मॅचमध्ये देखील टीम इंडियाने हँडशेक केला नाही. त्यावेळी गौतम गंभीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हँडशेकसाठी मैदानात जावा...
आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये, भारतीय खेळाडूंनी मॅच संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन (Handshake) करण्यास नकार दिला. या प्रकारामुळे एक मोठा वाद निर्माण झाला. भारतीय संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इतर खेळाडूंनी मॅच जिंकल्यानंतर थेट ड्रेसिंग रूममध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सुपर फोरच्या मॅचमध्ये देखील दोन्ही टीमच्या खेळाडूंनी हँडशेक केला नाही. त्यानंतर टीम इंडिया डगआऊटमधील गौतम गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यात तो हँडशेकसाठी जाण्यास सांगतोय.
advertisement
Arey umpire se to mil loo!!
Gautam Gambhir invited the Indian players to exchange handshakes—but only with the umpires pic.twitter.com/iBkdhye87j
— KKR Karavan (@KkrKaravan) September 21, 2025
खेळाडूंशी नाही तर अंपायरशी हँडशेक
आधीच ठरल्याप्रमाणे टीम इंडियाच्या खेळाडूंनी हँडशेक न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये परतू लागले. त्यावेळी गंभीरने पाकिस्तानी खेळाडूंशी नाही तर अंपायरशी तरी हँडशेक करून या, असं सांगितलं. त्यानंतर रिंकु सिंगसह काही खेळाडू मैदानात गेले अन् हँडशेक केला. गंभीर खेळाडूंना सुचना करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गंभीर क्रिकेटच्या नितिमत्तेबद्दल किती सजग आहे, याचा खरा चेहरा आता समोर आला आहे. त्यामुळे गंभीरचं कौतूक देखील होताना दिसतंय.
advertisement
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल
दरम्यान, अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या आक्रमक बॅटिंगपुढे त्यांची बॉलिंग पूर्णपणे निष्प्रभ ठरली. या विजयामुळे भारतीय टीमने स्पर्धेत आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याला रोखण्यात पाकिस्तानी बॉलर्स पूर्णपणे अपयशी ठरले. अभिषेकने केवळ 39 बॉलमध्ये 74 रन्सची वादळी खेळी करत एकप्रकारे मॅचचा निकाल पहिल्या काही ओव्हर्समध्येच लावला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 10:27 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : कुणीच तयार नव्हतं पण गंभीरच म्हणाला 'हँडशेक करून या...', कॅमेऱ्यात दिसला हेड कोचचा खरा मनसुबा! पाहा Video