IND vs SA : पंतला STUPID म्हटलं, मग 'या' खेळाडूला काय बोलाल? VIDEO पाहून डोक्यात तीव्र सणक जाईल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडिअमवर पार पडलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात साऊथ आफ्रिकाने 408 धावांनी भारताचा पराभव केला. या विजयासह साऊथ आफ्रिकने 2-0ने ही टेस्ट मालिका जिंकली आहे.
India vs South Africa 2nd Test : गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडिअमवर पार पडलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात साऊथ आफ्रिकाने 408 धावांनी भारताचा पराभव केला. या विजयासह साऊथ आफ्रिकने 2-0ने ही टेस्ट मालिका जिंकली आहे. विशेष म्हणजे भारताच्या भूमिवर मागच्या 25 वर्षातला दक्षिण आफ्रिकेचा पहिला टेस्ट मालिका विजय आहे.तर या मालिकेत टीम इंडियाच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. त्यातल एक कारण म्हणजे नितीश रेड्डी. खरं तर ऑस्ट्रेलिया विरूद्ध मालिकेत रिषभ पंत एक चुकीचा शॉर्ट खेळताना आऊट झाला होता, त्यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी त्याला स्टूपिड म्हटलं होतं. आता अशाच प्रकारे नितीश रेड्डी साऊथ आफ्रिकेविरूद्ध आऊट झाला आहे. त्यामुळे जर पंतला स्टूपिड म्हटलं गेलं तर नितीश रेड्डीला काय म्हणाल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खरं तर दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियापूढे 548 धावांचे आव्हान होते. हे आव्हान एका दिवसात पुर्ण करणे खूपच अशक्य होते. पण भारताची मोठी बॅटींग लाईन पाहता किमान सामना जरी जिंकता येत नसला तरी सामना ड्रॉ पर्यत नेण्याची चांगली क्षमता होती.पण गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील संघाला ते जमलं नाही आहे.त्यात टीम इंडियाच्या एका खेळाडूने तर हद्दच केली. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून नितीश रेड्डी होता.
advertisement
I hope MCG knock quota of Nitish Kumar Reddy is over and we never see him in Indian test team again and play a specialist batter or bowler in place of him. #INDvsSApic.twitter.com/CWVAOCa6DW
— Kusha Sharma (@Kushacritic) November 26, 2025
advertisement
नितीश रेड्डी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यावेळी नितीश रेड्डीच्या आधीचे खेळाडू पाहिले तर हे खेळाडू सरळ बॅटीने खेळून देखील आऊट झाले होते.अशापरिस्थितीत मैदानावर टीचून खेळण्याची गरज असताना नितीश रेड्डीने आल्या आल्याच रिव्हर्स स्विप खेळायला सूरूवात केली आणि तो डकवर आऊट होऊन बसला होता. त्यामुळे जिकडे सरळ बॅटीने बचावत्मक खेळायची गरज होती तिकडे रिव्हर्स स्विप खेळून नितीश रेड्डी आफ्रिकेला फुकटात विकेट देऊन बसला होता.
advertisement
अशीच घटना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील घडली होती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाच्या 474 धावांच्या उत्तरार्धात 191/5 पंत (28 धावांवर) स्कॉट बोलंडच्या शॉर्ट बॉलवर रॅम्प शॉट खेळून थर्ड मॅनवर नेथन लायनकडे कॅच आऊट झाला होता.त्यानंतर कमेंट्रीमध्ये बसलेल्या सुनील गावस्कर यांनी रिषभ पंतला STUPID, STUPID, STUPID म्हटलं होतं.
"तू आधीच्या बॉलवर मिस केलीस, तरी पुन्हा तेच शॉट? दोन फिल्डर्स तिथे आहेत! तू संघाला खूप निराश केलंस. असा शॉट खेळला तर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये परत येऊ नकोस, दुसऱ्या ड्रेसिंग रूममध्ये जा!",अशा शब्दात गावस्कर यांनी कमेंट्री बॉक्समधून संताप व्यक्त केला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 4:20 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : पंतला STUPID म्हटलं, मग 'या' खेळाडूला काय बोलाल? VIDEO पाहून डोक्यात तीव्र सणक जाईल


