IND vs SA : शुभमन गिल T20 सीरिज खेळणार का नाही? BCCI ने दिली मोठी अपडेट
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला मंगळवार 9 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या सीरिजमध्ये टी-20 टीमचा उपकर्णधार शुभमन गिल खेळणार का नाही? याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला मंगळवार 9 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या सीरिजमध्ये टी-20 टीमचा उपकर्णधार शुभमन गिल खेळणार का नाही? याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. टी-20 टीममध्ये गिलची निवड करण्यात आली होती, तरीही मेडिकल टीमने गिलला फिटनेसचं सर्टिफिकेट दिलं तरच तो टी-20 सीरिजमध्ये सहभागी होईल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं. यानंतर आता बीसीसीआयने गिलच्या फिटनेसबद्दल महत्त्वाची अपडेट दिली आहे.
शुभमन गिलला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून मैदानात उतरण्याची परवानगी मिळाली आहे. गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचवेळी मानेला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. गिलच्या गैरहजेरीमध्ये ऋषभ पंतने भारतीय टेस्ट टीमचं नेतृत्व केलं होतं. या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-0 ने लाजिरवाणा पराभव झाला होता. तसंच वनडे सीरिजमध्येही गिल खेळू शकला नव्हता. आता गिलचं रिहॅबिलिटेशन पूर्ण झालं असून तो मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.
advertisement
टी-20 सीरिजसाठी भारतीय टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर
टी-20 सीरिजचं वेळापत्रक
पहिली टी-20- 9 डिसेंबर, कटक
दुसरी टी-20- 11 डिसेंबर, चंडीगढ
तिसरी टी-20- 14 डिसेंबर, धर्मशाला
advertisement
चौथी टी-20- 17 डिसेंबर, लखनऊ
पाचवी टी-20- 19 डिसेंबर, अहमदाबाद
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 4:39 PM IST


