Team India : गंभीरचा 'तुघलकी' निर्णय, 162 चा स्ट्राईक रेट, आशिया कप जिंकवणाऱ्या फिनिशरची हकालपट्टी!

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया कपच्या फायनलआधी दुखापत झालेल्या हार्दिक पांड्याचं टी-20 टीममध्ये कमबॅक झालं आहे.

गंभीरचा 'तुघलकी' निर्णय, 162 चा स्ट्राईक रेट, आशिया कप जिंकवणाऱ्या फिनिशरची हकालपट्टी!
गंभीरचा 'तुघलकी' निर्णय, 162 चा स्ट्राईक रेट, आशिया कप जिंकवणाऱ्या फिनिशरची हकालपट्टी!
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया कपच्या फायनलआधी दुखापत झालेल्या हार्दिक पांड्याचं टी-20 टीममध्ये कमबॅक झालं आहे, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आलेला जसप्रीत बुमराहही पुनरागमन करत आहे. याशिवाय टी-20 टीमचा उपकर्णधार शुभमन गिल याची निवड करण्यात आली आहे, पण गिल फिट असेल तरच त्याला टीममध्ये सामील केलं जाईल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजवेळी गिलच्या मानेला दुखापत झाली होती, त्यानंतर गिल दुसरी टेस्ट आणि वनडे सीरिज खेळला नव्हता.

दोन जणांना डच्चू

याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियासोबत असलेल्या दोन ऑलराऊंडरना या सीरिजमधून डच्चू देण्यात आला आहे. नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग यांना टी-20 सीरिजमधून बाहेर करण्यात आलं आहे, यात रिंकू सिंगला बाहेर बसवण्याच्या निर्णयावरून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

रिंकू सिंगवर अन्याय?

आशिया कपच्या फायनलमध्ये रिंकू सिंगने 20 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला हारिस राऊफला फोर मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. मुख्य म्हणजे आशिया कपमध्ये रिंकू सिंग एकमेव सामना खेळला होता. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे रिंकूला थेट फायनलमध्ये खेळायची संधी मिळाली, भारत-पाकिस्तान यांच्यातल्या या हाय व्होल्टेज सामन्यात तणावाखाली रिंकूने फोर मारून भारताला विजय मिळवून दिला.
advertisement
आयपीएलच्या मागच्या काही मोसमांपासून रिंकू सिंग केकेआरचा फिनिशर आहे. आयपीएलमध्ये रिंकू 145.18 चा स्ट्राईक रेट आणि 30.53 च्या सरासरीने बॅटिंग करतो. तर टी-20 फॉरमॅटमध्ये रिंकूचा स्ट्राईक रेट 161.77 आणि सरासरी 42.31 आहे. फक्त टी-20 क्रिकेटच नाही तर यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्येही रिंकू मोठे स्कोअर करत आहे. तामिळनाडूविरुद्ध रिंकूने 176 आणि ओडिशाविरुद्ध नाबाद 165 रनची खेळी केली आहे, यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये संघर्ष करणाऱ्या टीम इंडियामध्ये रिंकूची निवड करा, अशी मागणी होत आहे. पण दुसरीकडे रिंकूला टी-20 टीममधूनही डच्चू देण्यात आला आहे.
advertisement

टी-20 सीरिजसाठी भारतीय टीम

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : गंभीरचा 'तुघलकी' निर्णय, 162 चा स्ट्राईक रेट, आशिया कप जिंकवणाऱ्या फिनिशरची हकालपट्टी!
Next Article
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement