IND vs WI : खतरनाक शॉटवर साईचा चमत्कार, दुखापत झाली तरी कॅच पकडला, Video पाहून शॉक व्हाल!

Last Updated:

टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये मोठा स्कोअर केला आहे. यानंतर फिल्डिंग करताना साई सुदर्शनने अफलातून कॅच पकडला आहे.

खतरनाक शॉटवर साईचा चमत्कार, दुखापत झाली तरी कॅच पकडला, Video पाहून शॉक व्हाल!
खतरनाक शॉटवर साईचा चमत्कार, दुखापत झाली तरी कॅच पकडला, Video पाहून शॉक व्हाल!
मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये मोठा स्कोअर केला आहे. यशस्वी जयस्वालच्या 175 रन आणि कर्णधार शुभमन गिलच्या नाबाद 129 रननंतर भारताने 518/5 वर इनिंग घोषित केली. यानंतर वेस्ट इंडिजची पहिली विकेट 21 रनवर गेली. साई सुदर्शनने वेस्ट इंडिजचा ओपनर जॉन कॅम्पबेलचा अपलातून कॅच पकडला आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना साई सुदर्शन शतकापासून चुकला, पण फिल्डिंग करताना त्याने कोणतीही चूक केली नाही. शॉर्ट लेगवर साई सुदर्शनने असा कॅच पकडला, जे पाहून टीम इंडियाचे खेळाडूही अवाक झाले. रवींद्र जडेजाच्या बॉलिंगवर कॅम्पबेलने जलद स्वीप शॉट मारला, पण साई सुदर्शनने चित्त्यासारखी चपळता दाखवली. हा कॅच पकडल्यानंतर साई सुदर्शनला दुखापतही झाली, त्यामुळे त्याला मैदानातून बाहेर जावं लागलं.
advertisement
या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर भारताने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने 5 विकेट गमावून 518 रन केले आणि डाव घोषित केला. साई सुदर्शनने 87 रनची खेळी केली, तर नितीश कुमार रेड्डीने 49, ध्रुव जुरेलने 44 आणि केएल राहुलने 38 रन केले. वेस्ट इंडिजकडून वॉरिकनने 3, रॉस्टन चेसने एक विकेट घेतली.
advertisement

वेस्ट इंडिजने गमावल्या 4 विकेट

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने 140 रनवर 4 विकेट गमावल्या आहेत, त्यामुळे ते आणखी 378 रननी पिछाडीवर आहेत. भारताकडून रवींद्र जडेजाला 3 आणि कुलदीप यादवला एक विकेट मिळाली आहे. वेस्ट इंडिजकडून शाय होप 31 रनवर आणि टेव्हिन इमलाच 14 रनवर बॅटिंग करत आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : खतरनाक शॉटवर साईचा चमत्कार, दुखापत झाली तरी कॅच पकडला, Video पाहून शॉक व्हाल!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement