INDvsSL : सामना गमावण्याची भीती, तरी गंभीरने पत्करला धोका; घेतला धक्कादायक निर्णय
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शेवटच्या सामन्यात भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीरने असे निर्णय घेतले ज्यामुळे भारतीय संघाचा पराभवसुद्धा होऊ शकला असता.
कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या टी२० मालिकेत भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला. गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. भारतीय संघाने सलग तीन सामने जिंकून टी२० मालिकेत क्लीन स्वीप केलं. शेवटच्या सामन्यात भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीरने असे निर्णय घेतले ज्यामुळे भारतीय संघाचा पराभवसुद्धा होऊ शकला असता. मात्र भविष्यातील प्लॅन डोळ्यासमोर ठेवून गंभीरने चक्क सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांना गोलंदाजी दिली. शेवटची दोन षटके त्यांनी टाकली.
भारताने श्रीलंकेविरुद्धची टी२० मालिका 3-0 ने जिंकली. या विजयात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा प्रभाव दिसून आला. मालिकेत काही प्रयोगही केले गेले जे भारतासाठी फायद्याचे ठरले. तिसऱ्या सामन्यात विजय आणि पराभव दोन्हीकडे पारडं झुकत असताना रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांना गोलंदाजी सोपवण्याचा कठीण निर्णय घेतला गेला. विशेष म्हणजे हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. पण जर चूक झाली असती तर सामना गमवावा लागला असता.
advertisement
तिसऱ्या टी२० सामन्यात १२ चेंडूत श्रीलंकेला ९ धावा हव्या होत्या. तेव्हा रिंकू सिंहला ओव्हर देण्याचा निर्णय घेतला. रिंकूने ३ धावा देत २ विकेट घेतल्या आणि सामान भारताच्या बाजूने झुकला. यानंतर शेवटच्या षटकात ६ धावा लंकेला हव्या होत्या. कर्णधार सूर्यकुमार यादवने गोलंदाजी केली. विशेष म्हणजे त्यानेही दोन विकेट घेतल्या. मात्र सामना टाय झाला.
advertisement
गौतम गंभीरचा प्लॅन ठरला असून त्याने मालिका विजयानंतर क्लीन स्वीपशी तडजोड करण्यासाठीही तो तयारी ठेवली होती. त्यामुळेच त्याने आधी रिंकू आणि नंतर सूर्यकुमारला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. मैदानात सूर्यकुमार यादवने गंभीरच्या प्लॅननुसार खेळ केला आणि भारताने मालिका 3-0 ने जिंकली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2024 11:39 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
INDvsSL : सामना गमावण्याची भीती, तरी गंभीरने पत्करला धोका; घेतला धक्कादायक निर्णय