IND vs PAK Boycott : भारत-पाक सामन्यावरून टीम इंडियामध्ये उभी फूट, ड्रेसिंग रुममध्ये वाद! अखेर गंभीरने घेतला मोठा निर्णय!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Indian Cricket team Dressing Room : टीम इंडियातील काही खेळाडूंनी खेळण्यास नकार नोंदवला तर काही खेळाडूंनी खेळण्यास सहमती दर्शवली होती.
India vs Pakistan Boycott : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याआधी भारतात राजकीय मंचावर मोठा वाद पेटला आहे. टीम इंडिया पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan Match Boycott) सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी केली जात आहे. अशातच आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये देखील आशिया कपमधील (Asia cup 2025) या सामन्यावर मोठा वाद पेटल्याची माहिती समोर आली आहे. मॅच खेळण्यावरून दोन गट निर्माण (Dressing Room Controvesy) झाले होते. मात्र, गंभीरने अखेरची भूमिका मांडली अन् वाद मिटला.
अतिशय संवेदनशील मुद्दा - सहाय्यक प्रशिक्षक
शनिवारी संघ व्यवस्थापनाने सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांना सामन्याच्या पत्रकार परिषदेला महत्त्वाची उत्तरं दिली. त्यावेळी त्यांना भारत पाकिस्तान सामन्यावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी 'हा एक अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. मला यात काही शंका नाही की खेळाडूंना बहुसंख्य भारतीय जनतेच्या सहानुभूती आणि भावना आहेत. आशिया कप बराच काळ अनिश्चित होता आणि आम्ही फक्त वाट पाहत होतो. आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही एका टप्प्यावर येऊ. पण अर्थातच, सरकारची भूमिका काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, असं रायन टेन डोइशेट यांनी म्हटलं आहे.
advertisement
ड्रेसिंग रुममध्ये गंभीर चर्चा
शनिवारी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून वाद पेटला होता. टीम इंडियातील काही खेळाडूंनी खेळण्यास नकार नोंदवला तर काही खेळाडूंनी खेळण्यास सहमती दर्शवली होती. त्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये गंभीर चर्चा झाली. टीम इंडियाची मिटिंग देखील झाली. त्यानंतर टीम इंडिया मैदानात उतरेल, असं ठरवलं गेलं आहे. गंभीरने मध्यस्थी केल्यानंतर टीम इंडियातील वाद पेटल्याचं पहायला मिळालं आहे.
advertisement
All Set & Raring To Go
It's Match No. for #TeamIndia in #AsiaCup2025 pic.twitter.com/vKUgTJ1HAD
— BCCI (@BCCI) September 14, 2025
गंभीरकडून खेळाडूंना स्पष्ट संकेत
दरम्यान, मला आमची भूमिका आणि मी स्पष्ट केल्याप्रमाणे भावना समजतात, परंतु बीसीसीआय आणि भारत सरकारने सध्या देशासाठी जे योग्य ठरवले आहे त्याचे आम्ही पालन करत आहोत, असं रायन टेन डोइशेट यांनी म्हटलं आहे. गंभीरकडून टीम इंडियाच्या खेळाडूंना स्पष्ट संकेत दिले गेले आहेत की, खेळाडूंनी फक्त पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करावं. खेळाडूंनी सरावावर लक्ष द्यावं आणि सामना जिंकण्यासाठी आक्रमक प्रयत्न करावा, अशी माहिती देखील समोर आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 11:55 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK Boycott : भारत-पाक सामन्यावरून टीम इंडियामध्ये उभी फूट, ड्रेसिंग रुममध्ये वाद! अखेर गंभीरने घेतला मोठा निर्णय!