IPL 2024 : उद्यापासून IPL चा रणसंग्राम, चेन्नई - बंगळुरूमध्ये पहिला सामना, कसा आहे दोन्ही संघांचा मॅच रेकॉर्ड?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
शुक्रवारी उदघाटन सामना हा चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात येईल.
मुंबई : जगातील सर्वात मोठया टी 20 लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीगचा नवा सिझन उद्या 22 मार्च रोजी पासून सुरु होणार आहे. शुक्रवारी उदघाटन सामना हा चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात येईल. चेन्नई सुपरकिंग्सने मागील वर्षी विजेतेपद पटकावून तब्बल पाचव्यांदा ट्रॉफी नावावर केली होती. तर आरसीबीचा संघ मागील 16 वर्षात एकदाही विजेतेपदं जिंकू शकलेला नाही. तेव्हा यंदा 16 व्या वर्षी आरसीबी ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळवला जाईल. यापूर्वी दोन्ही टीममध्ये आतापर्यंत आयपीएलचे 31 सामने खेळवले गेले होते. यापैकी 20 सामने सीएसकेने जिंकले होते तर 10 सामने आरसीबीने जिंकले. तर एक सामना रद्द करण्यात आला होता.
advertisement
चेन्नई सुपरकिंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सर्वात मोठा पराभव हा 28 मे 2011 रोजी केला होता. यावेळी दोन्ही संघांमध्ये आयपीएल फायनल खेळवली गेली होती. तेव्हा सीएसकेने आरसीबीला 58 धावांनी हरवले होते. यावेळी सीएसकेने फायनलमध्ये 5 विकेट्स घेऊन 205 धावा केल्या होत्या तर आरसीबी 8 विकेट्स गमावून 147 धावाचं करू शकली होती.
advertisement
कधी, कुठे पाहाल सामना?
चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणारा आयपीएल 2024 चा पहिला सामना हा सायंकाळी 7 : 30 वाजता सुरु होईल. तर त्यापूर्वी अर्धतास अगोदर दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडेल. आयपीएलचे सर्व सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील तर या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमावर दाखवण्यात येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 21, 2024 7:20 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2024 : उद्यापासून IPL चा रणसंग्राम, चेन्नई - बंगळुरूमध्ये पहिला सामना, कसा आहे दोन्ही संघांचा मॅच रेकॉर्ड?