IPL 2025 : ...तरच मुंबई टॉप 2 मध्ये पोहोचणार? हार्दिकला कोणत्या अग्निपरिक्षेतून जावं लागणार, वाचा समीकरण

Last Updated:

या समीकरणात प्रत्येक टीम टॉप 2 मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतेय. मुंबई सध्या चौथ्या स्थानी आहे.आणि त्यांचा शेवटचा सामना बाकी आहे.अशा परिस्थितीतही मुंबई इंडियन्स टॉप 2 मध्ये जाऊ शकते. त्यामुळे हे कसं शक्य होणार आहे? हे समजून घेऊयात.

IPL 2025,Mumbai Indians
IPL 2025,Mumbai Indians
IPL 2025 News: आयपीएल 2025च्या अंतिम टप्प्यातील सामन्यात अनेक मोठे उलटफेर होताना दिसतायत. प्लेऑफमधून बाहेर झालेल्या टीम टॉप 4 मध्ये असलेल्या संघाना पराभूत करताना दिसत आहेत. त्यामुळे समीकरण सतत बदलते आहे. या समीकरणात प्रत्येक टीम टॉप 2 मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतेय. मुंबई सध्या चौथ्या स्थानी आहे.आणि त्यांचा शेवटचा सामना बाकी आहे.अशा परिस्थितीतही मुंबई इंडियन्स टॉप 2 मध्ये जाऊ शकते. त्यामुळे हे कसं शक्य होणार आहे? हे समजून घेऊयात.
मुंबई सध्या पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. मुंबईचे 13 सामन्यात गुण 16 सर्वांत कमी आहे. मुंबईने जर त्यांचा शेवटचा सामना जिंकला तर त्याचे गुण 18 होणार आहेत. मात्र तरी देखील मुंबईचा टॉप 2 मध्ये पोहोचता येणार नाही आहे.कारण गुजरात 18 गुणांनी आधीच टेबल टॉपला आहे.त्यानंतर पंजाब किंग्ज आणि बंगळुरूचे 17 गुण होते. त्यामुळे मुंबईसाठी टॉप 2 अशक्यच आहे.
advertisement

बंगळुरूला दोन्ही सामने हरले पाहिजेत...

पण तरी जर पाहायला गेलं तर बंगळुरूला काल हैदराबादने पराभूत केलं होतं. त्यामुळे बंगळुरूचे 17 गुण राहिले.आता त्यांचा पुढचा सामना लखनऊसोबत आहे. ही तिच लखनऊ आहे जिने बलाढ्य गुजरात टायटन्सचा दोनच दिवसापुर्वी पराभव केला होता. आता लखनऊने पुन्हा एकदा अशीच कामगिरी केली तर बंगळुरूचा मोठा गेम होईल आणि ती चौथ्या स्थानावर ढकलली जाईल.
advertisement
पंजाब किंग्ज संध्या 17 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आणि पंजाबचे दोन सामने उरले आहे. एक दिल्ली विरूद्ध आणि एक मुंबई विरूद्ध आहे. पंजाबसमोर ही दोन्ही मोठी आव्हान आहेत.त्यामुळे पंजाब जर हे दोन्ही सामने हारली तर ती तिसऱ्या स्थानी फेकली जाईल.
त्यामुळे बंगळुरू आणि पंजाबने दोन्ही हारल्याचा थेट फायदा मुंबईला होईल आणि मुंबई टॉप 2मध्ये पोहोचेल. गुजरात बद्दल बोलायचं झालं तर त्यांचे सध्या 18 गुण आहेत. त्यांचा पुढचा सामना चेन्नईशी आहे.चेन्नईचा सध्याचा फॉर्म पाहता गुजरात त्यांना हरवून 20 गुण मिळवून टेबल टॉपला कायम राहिल.
advertisement

मुंबईचा क्वालिफायर सामना कुणासोबत?

जर गुजरातने चेन्नईचा पराभव करत 20 गुण मिळवले तर शुभमन गिलची टीम टॉपला जाईल. अशाप्रकारे एक नंबरवर असलेल्या गुजरात टायटन्स आणि दोन नंबरवर असलेल्या मुंबई इंडियन्समध्ये पहिला क्वालिफायर सामना पार पडेल.या सामन्यात जिंकणारा संघाला थेट फायनलचं तिकीट मिळेल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : ...तरच मुंबई टॉप 2 मध्ये पोहोचणार? हार्दिकला कोणत्या अग्निपरिक्षेतून जावं लागणार, वाचा समीकरण
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement