IPL 2026 : 'लग्न ठरलंय, मी येणार नाही...', लिलावात 8 कोटी मिळालेल्या दिग्गज खेळाडूचा आयपीएल टीमला शॉक!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 साठीचा लिलाव मंगळवारी अबूधाबीमध्ये झाला. या लिलावामध्ये फक्त परदेशीच नाही तर फार कुणालाही माहिती नसलेल्या भारतीय युवा खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली.
मुंबई : आयपीएल 2026 साठीचा लिलाव मंगळवारी अबूधाबीमध्ये झाला. या लिलावामध्ये फक्त परदेशीच नाही तर फार कुणालाही माहिती नसलेल्या भारतीय युवा खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. कॅमरून ग्रीनला कोलकाता नाईट रायडर्सनी तब्बल 25.20 कोटी रुपयांना विकत घेतलं. ग्रीन हा आयपीएल इतिहासातील सगळ्यात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. तर प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा आतापर्यंतच्या आयपीएल लिलावातले सगळ्यात महागडे भारतीय अनकॅप्ड खेळाडू ठरले आहेत.
आयपीएलच्या या लिलावामध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने ऑस्ट्रेलियाचा विकेट कीपर जॉश इंग्लिस याच्यासाठी 8.60 कोटी रुपयांची बोली लावली, पण लखनऊच्या या बोलीवरून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. जॉश इंग्लिस हा आयपीएल 2026 मध्ये फक्त 4 मॅचसाठी उपलब्ध असेल. आयपीएलदरम्यान इंग्लिसचं लग्न असल्यामुळे तो 4 मॅच खेळेल, असं त्याने आधीच स्पष्ट केलं होतं. याच कारणामुळे पंजाब किंग्सने इंग्लिसला लिलावाआधी रिलीज केलं होतं. जॉश इंग्लिस 4 मॅच खेळणार आहे, हे माहिती असूनही लखनऊने त्याच्यासाठी 8 कोटी 60 लाख रुपये खर्च का केले? असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात आहे.
advertisement
लखनऊकडे आधीच 4 विकेट कीपर
लखनऊ सुपर जाएंट्सकडे ऋषभ पंत, निकोलस पूरन, मॅथ्यू ब्रीट्झकी, मुकूल चौधरी हे चार विकेट कीपर आहेत. असं असतानाही त्यांनी विकेट कीपर असलेल्या जॉश इंग्लिससाठी कोट्यवधी रुपये खर्च केले.
लखनऊची पूर्ण टीम
अक्षत रघुवंशी, अब्दुल समद, एडन मार्करम, आयुष बदोनी, हिंमत सिंग, जॉश इंग्लिस, मुकूल चौधरी, मॅथ्यू ब्रीट्झकी, निकोलस पूरन, ऋषभ पंत, वानिंदू हसरंगा, अर्जुन तेंडुलकर, आर्शिन कुलकर्णी, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, एनरिक नॉर्किया, नमन तिवारी, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी, मनिमरन सिद्धार्थ, मयंक यादव, मोहम्मद शमी, मोहसिन खान, प्रिन्स यादव, आकाश महाराज सिंग
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 7:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 'लग्न ठरलंय, मी येणार नाही...', लिलावात 8 कोटी मिळालेल्या दिग्गज खेळाडूचा आयपीएल टीमला शॉक!










