Mumbai Indians : वानखेडेवरून मारलेला सिक्स, आता अरबी समुद्रात जाणार... मुंबईने गुजरातकडून खेचून आणला नवा 'पोलार्ड'!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 साठीची ट्रेड डील 15 नोव्हेंबरपर्यंत करायची आहे. प्रत्येक टीमला त्यांनी रिटेन, रिलीज आणि ट्रेड केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे, पण याच्या 48 तास आधीच मुंबईने धमाका केला आहे.
मुंबई : आयपीएल 2026 साठीची ट्रेड डील 15 नोव्हेंबरपर्यंत करायची आहे. 15 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता प्रत्येक टीमला त्यांनी रिटेन, रिलीज आणि ट्रेड केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे, पण याच्या 48 तास आधीच मुंबईने धमाका केला आहे. आधी शार्दुल ठाकूरला लखनऊकडून घेतल्यानंतर आता मुंबईने वेस्ट इंडिजच्या धमाकेदार फिनिशरलाही गुजरातकडून घेतलं आहे.
गुजरात टायटन्सचा आक्रमक फिनिशर शरफेन रदरफोर्डला मुंबईने 2.6 कोटी रुपयांमध्ये ट्रेड करून विकत घेतलं आहे. वेस्ट इंडिजचा डावखुरा आक्रमक बॅटर असलेल्या शरफेन रदरफोर्डचं मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक झालं आहे, याआधी रदरफोर्ड 2020 साली ट्रॉफी जिंकलेल्या मुंबई इंडियन्सचा भाग होता. फिनिशरशिवाय शरफेन रदरफोर्ड मीडियम फास्ट बॉलिंगही करतो.
आयपीएलच्या मागच्या मोसमात मुंबई इंडियन्सकडे नमन धीरशिवाय कोणताही फिनिशर नव्हता, त्यामुळे ही कमी पूर्ण करण्यासाठी मुंबईने रदरफोर्डची टीममध्ये निवड केली आहे. मागच्या काही काळापासून मुंबई कायरन पोलार्डचा पर्याय शोधत आहे, त्यामुळे रदरफोर्ड पोलार्डची जागा भरून काढणार का? हे येणाऱ्या मोसमात स्पष्ट होईल.
advertisement
advertisement
रदरफोर्डचं रेकॉर्ड
शरफेन रदरफोर्डने आतापर्यंत 23 आयपीएल सामन्यांमध्ये 137.38 चा स्ट्राईक रेटने 397 रन केले आहेत. तर वेस्ट इंडिजकडून खेळताना रदरफोर्डने 137.39 चा स्ट्राईक रेट आणि 18.38 च्या सरासरीने 44 सामन्यांमध्ये 588 रन केले. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये 6 इनिंगमध्ये 8.63 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग करत एक विकेटही मिळवली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये रदरफोर्डच्या नावावर 4 इनिंगमध्ये 2 विकेट आहेत.
advertisement
शार्दुल ठाकूरही मुंबईच्या ताफ्यात
दुसरीकडे मुंबई इंडियन्सने शार्दुल ठाकूरलाही लखनऊसोबत ट्रेड करून मुंबईमध्ये आणलं आहे. मूळचा पालघरचा असलेला शार्दुल ठाकूर हा प्रथम श्रेणी क्रिकेट मुंबईकडून खेळतो. रणजी ट्रॉफीच्या या मोसमात शार्दुल मुंबईचा कर्णधारही आहे. शार्दुलकडे वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचा बराच अनुभव आहे, त्यामुळे त्याचा हा अनुभव मुंबईच्या कामाला नक्कीच येईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 7:09 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : वानखेडेवरून मारलेला सिक्स, आता अरबी समुद्रात जाणार... मुंबईने गुजरातकडून खेचून आणला नवा 'पोलार्ड'!


