Mumbai Indians : गिलने टीम इंडिया बाहेर केलं, त्यालाच रोहितने परत आणलं... मुंबई इंडियन्सने केली IPL ची पहिली डिल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या ट्रेडला आता अवघे दोन दिवस शिल्लक असताना मुंबई इंडियन्सने पहिली ट्रेड डील केली आहे.
मुंबई : आयपीएल 2026 च्या ट्रेडला आता अवघे दोन दिवस शिल्लक असताना मुंबई इंडियन्सने पहिली ट्रेड डील केली आहे. आयपीएल 2026 साठी खेळाडू रिटेन आणि रिलीज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर आहे, याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता सगळ्या 10 टीम त्यांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करणार आहेत, पण त्याआधीच मुंबई इंडियन्सने मोठी घोषणा केली आहे. मुंबईकर शार्दुल ठाकूरला मुंबईने लखनऊकडून ट्रेड केलं आहे.
ऑलराऊंडर असलेला शार्दुल ठाकूर मुंबईकडूनच प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो, तसंच सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीच्या मोसमात शार्दुल मुंबईचा कर्णधारही आहे. तसंच आयपीएलमध्येही शार्दुलला बराच अनुभव आहे. आयपीएलमध्ये शार्दुल 105 मॅच खेळला आहे, यात त्याला 107 विकेट मिळाल्या आहेत, तसंच बॅटिंगमध्येही शार्दुलने बऱ्याच मॅच जिंकवून दिल्या आहेत. आयपीएलमधला त्याचा सर्वाधिक स्कोअर 68 रन आहे.
advertisement
शार्दुल टीम इंडियातून बाहेर
शार्दुल ठाकूरची यावर्षाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली, तसंच त्याला खेळण्याची संधीही मिळाली, पण त्यानंतर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी त्याची टीम इंडियात निवड केली गेली नाही. आठव्या क्रमांकावर फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून नितीश कुमार रेड्डीवर कर्णधार शुभमन गिलने विश्वास दाखवला. विराट आणि रोहित कर्णधार असताना टीम इंडियासाठी गोल्डन आर्म ठरलेला शार्दुल ठाकूर आता आयपीएलमध्ये त्याचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. याआधी शार्दुल चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जाएंट्स, रायजिंग पुणे सुपर जाएंट्स, केकेआर या टीमकडून खेळला आहे.
advertisement
advertisement
मुंबईचं बॉलिंग आक्रमण मजबूत
मुंबईकडे आधीच जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्ट हे दोन दिग्गज फास्ट बॉलर आहेत. यानंतर आता शार्दुल ठाकूरचीही टीममध्ये एन्ट्री झाली आहे, त्यामुळे मुंबईचं बॉलिंग आक्रमण आणखी मजबूत झालं आहे.
अर्जुन तेंडुलकरची साथ सोडणार?
दुसरीकडे मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरची साथ सोडण्याची शक्यता आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई अर्जुन तेंडुलकरला लखनऊ सुपर जाएंट्सला ट्रेड करणार आहे. या ट्रेडबाबत मात्र मुंबईकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 6:06 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : गिलने टीम इंडिया बाहेर केलं, त्यालाच रोहितने परत आणलं... मुंबई इंडियन्सने केली IPL ची पहिली डिल!


