Delhi Blast: i20चा ब्लास्ट तर फक्त ट्रेलर, बाबरी वर्धापनदिनी देशात Serial Revenge Attackचा प्लान; फक्त एक i20 नव्हे, 32 कार तयार

Last Updated:

Delhi Blast: लाल किल्ला ब्लास्टच्या तपासात असा भयानक कट उघड झाला आहे की दिल्लीसह अनेक राज्यांच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांनी 6 डिसेंबरला 32 कार बॉम्बने देशभरात साखळी स्फोट करण्याची योजना आखली होती.

News18
News18
नवी दिल्ली: लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या स्फोटाच्या तपासात गुरुवारी मोठा खुलासा झाला आहे. पोलिस सूत्रांच्या मते, दहशतवादी 6 डिसेंबर म्हणजे बाबरी मशीद पाडण्यात आलेल्या दिवसाच्या वर्धापनदिनी, दिल्लीसह अनेक ठिकाणी साखळी हल्ले करण्याच्या तयारीत होते.
या हल्ल्यांसाठी त्यांनी 32 कारांची व्यवस्था केली होती. या सर्व गाड्यांमध्ये बॉम्ब आणि स्फोटक साहित्य भरून वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवण्याच्या योजना होत्या. या गाड्यांमध्ये ब्रेजा, स्विफ्ट डिजायर, इकोस्पोर्ट आणि आय20 अशा अनेक मॉडेल्सचा समावेश होता. आतापर्यंत तपास संस्थांना चार गाड्या सापडल्या आहेत.
advertisement
10 नोव्हेंबरला ज्यात स्फोट झाला ती i20 कारही यासीरियल रिवेंज अटॅक’चा भाग होती. या ब्लास्टमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी आहेत. त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.
advertisement
दरम्यान केंद्र सरकारने या कार ब्लास्टला दहशतवादी हल्ला मानले असून बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात प्रस्तावही पारित करण्यात आला.
दुसऱ्या संशयित कारची तपासणी सुरु
पोलिसांनी आधीच शंका व्यक्त केली होती की या हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांकडे एक नव्हे तर दोन गाड्या होत्या. त्यामुळे बुधवारी दिल्ली, यूपी आणि हरियाणामध्ये अलर्ट जारी करण्यात आला.
advertisement
यानंतर हरियाणातील खंदावली गावात एक संशयास्पद बेवारस कार आढळली. या गाडीची तपासणी करण्यासाठी NSG बॉम्ब स्क्वाड पोहोचले आहे. गाडी अद्याप पूर्णतः उघडण्यात आलेली नाही. सूत्रांच्या मते, ही कार ज्या ठिकाणी सापडली ते ठिकाण उमरचा ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीच्या बहिणीच्या घराजवळ आहे.
advertisement
दिल्ली ब्लास्टमध्ये 3 मोठे खुलासे
1) जानेवारीत लाल किल्ल्याची रेकी केली होती
दिल्लीला हादरवण्याच कट जानेवारीपासूनच सुरू केला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईल डंप डेटा मध्ये दिसले की फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीमधून अटक केलेले असिस्टंट प्रोफेसर डॉ. मुजम्मिल गनी आणि स्फोटात मृत मानले जाणारे डॉ. उमर नबी याने जानेवारीत अनेक वेळा लाल किल्ल्याची रेकी केली होती.
advertisement
दोघांनीही तिथली सुरक्षा, भीड, पॅटर्न यांचा अभ्यास केला होता. पोलिसांच्या मते या दोघांची योजना 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर हल्ला करण्याची होती, पण ती योजना तेव्हा फसली.
advertisement
2) 6 डिसेंबरला दिल्लीमध्ये हल्ल्याची योजना
नबीची इच्छा होती की 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडण्याच्या दिवसाच्या वर्धापनदिनी दिल्लीमध्ये मोठा हल्ला करण्याची होती. परंतु मुजम्मिल गनीच्या अटकेनंतर ही योजना बिघडली. ही माहिती 8 आरोपींच्या चौकशीतून समोर आली आहे.
या इंटर-स्टेट मॉड्यूलचे केंद्र फरीदाबादमध्ये होते. अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये 6 डॉक्टर असल्याचेही धक्कादायक वास्तव समोर आले आहे. श्रीनगरचा आणखी एक संशयित डॉ. निसार फरार असून तो डॉक्टर्स असोसिएशन ऑफ कश्मीरचा अध्यक्ष होता. अल फलाहमध्ये तो अध्यापन करत होता. जम्मू-कश्मीर सरकारने त्याला सेवेतून बडतर्फ केले आहे.
3) खताची पोती सांगून विस्फोटक जमा करत होता
फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीत काम करणारा कश्मीरी डॉक्टर मुजम्मिल गनी किरायाच्या खोलीत खताची पोती असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जमा करत होता. सुमारे 20 दिवसांपूर्वी तो काही पोती खोलीत ठेवण्यासाठी आला तेव्हा शेजाऱ्यांनी विचारले हे काय आहे? त्यावर गनीने उत्तर दिले- हे खताचे कट्टे आहेत, कश्मीरला न्यायचं आहे.
ज्या खोलीत हे साहित्य ठेवले होते त्यापासून 100 मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे होते. पोलिसांनी त्या फुटेजचा ताबा घेतला आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Delhi Blast: i20चा ब्लास्ट तर फक्त ट्रेलर, बाबरी वर्धापनदिनी देशात Serial Revenge Attackचा प्लान; फक्त एक i20 नव्हे, 32 कार तयार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement